फिल्मी स्टाईल ड्रामा! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न अन् पोलिसाचे धाडस…

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. कळंब तालुक्यातील बोर्डा गावात दोन धारदार शस्त्रांसह आरोपींनी युवतीच्या घरात प्रवेश करत आई आणि बहिणीचा विरोध झुगारून तिला इरटिका गाडीतून जबरदस्तीने पळवून नेले होते. दगडवाडी खदानजवळ पोलिसांनी आरोपींना घेरलं पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी थेट झेप घेत आरोपीला पकडले. या कारवाईत […]

अधिक वाचा...

सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…

सांगली: शिराळा तालुक्यातील प्रेमविवाह केलेल्या एका युवतीने सासरच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे. पूजा शिवम पाटील (वय २४, रा. पाडळी, ता. शिराळा) असे मृत विवाहित युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय […]

अधिक वाचा...

आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह…

नंदूरबार: आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबारमधील विमला हाऊसिंग परिसरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील एका वीस वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत मुलगी ही नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. पण, मुलीचा घातपात झाल्याचा तिच्या पालकांचा आरोप आहे. मुलीच्या वस्तीगृह प्रवेश आणि पालक कागदपत्रावर तिच्या […]

अधिक वाचा...

पोलिस भरतीवेळी प्रेम, नोकरी अन् युवतीने घेतला जगाचा निरोप…

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना घडली आहे. पोलिस भरतीची तयारी करताना जुळलेले प्रेमसंबंध, त्यानंतर मिळालेली सरकारी नोकरी, बदललेलं नातं आणि अखेर मानसिक छळ अन् अपमानाच्या आरोपातून एका युवतीने (वय २२) जीवन संपवले आहे. युवतीच्या मृत्यूनंतर आईने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली आणि अखेर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

मुग्धा लंडनहून गुपचूप आली पुण्यात अन् मृत्यू; चक्रावून सोडणारा घटनाक्रम…

पुणे: लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४) या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले, ज्यामध्ये भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट […]

अधिक वाचा...

मुग्धा लंडनमध्येच असल्याचे भासवत होती; पुण्यात आढळला मृतदेह…

पुणे: मुग्धा अविनाश देशमुख (वय 34) हिचा पुण्यातील एका बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता भारतात परतली होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुग्धा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलिसांकडे धाव घेतली होती. अपहरणाच्या […]

अधिक वाचा...

पुणे! युवतीसोबत कात्रज परिसरात घडला धक्कादायक प्रकार…

पुणे: पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुखसागरनगर परिसरात एका युवतीची भररस्त्यात छेडछाड करून तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. संबंधित धक्कादायक घटना शनिवारी (ता. २४) सायंकाळच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील समर्थ डेअरीसमोर घडली. […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…

सिंधुदुर्ग: कॉलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिचा निर्घृण खून करणाऱ्या साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ- धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याला त्याच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून चाकूने १७ ते १८ वार करून दामिनीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. साहिल याला कुडाळ पोलिसांनी […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल मुख्य रस्त्याजवळील एका ओढ्याच्या बाजूला दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या महाविद्यालयीन युवतीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संशयित साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी मध्यरात्री चार वाजता अटक […]

अधिक वाचा...

बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…

बीड: गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतची माहिती मुलींच्या पालकांना मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. लुखामसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अविनाश ढेरे हा शिक्षक कार्यरत आहे. याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!