महाराष्ट्र
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…
by टीम पोलिसकाकापुणे: पायल झांबरे यांचा हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईल, तसेच मृत पायल यांचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, पती, सासू आणि सासऱ्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी पती अक्षय […]
कल्याणहून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू…
by टीम पोलिसकाकापुणे : अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबातील चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात अपघाताची घटना घडली. कल्याण येथील भारंबे कुटुंबावर मोहोळ तालुक्यात काळाने घाला घातला. आनंदात प्रवासाला निघालेल्या या कुटुंबावर काळानं इतका भीषण घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कल्याण येथील भारंबे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर […]
ठाण्यातील पूर्णेकर हत्याकांडाचा तपास अन्य यंत्रणेकडे वर्ग करावा; पूर्णेकर कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका…
by टीम पोलिसकाकामुंबई: ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास संथ गतीने चालू असून, या हत्येचा कट रचणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास काढून घ्यावा आणि अन्य एखाद्या स्वतंत्र यंत्रणेकडे […]
‘पोलीस भरती घोटाळा’ रॅकेट उघडकीस आणणार्या वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू…
by टीम पोलिसकाकाबीड: राज्यातील पोलीस भरती प्रकियेतील मोठा घोटाळा काही दिवसांपूर्वी समोर आला होता. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याचं मोठं रॅकेट समोर आले होते. हे रॅकेट बीडच्या वैभव चव्हाण याने उघडकीस आणले होते. खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्यांचे रॅकेट उघडकीस आणणार्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ […]
सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…
by टीम पोलिसकाकासांगली: शिराळा तालुक्यातील प्रेमविवाह केलेल्या एका युवतीने सासरच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे. पूजा शिवम पाटील (वय २४, रा. पाडळी, ता. शिराळा) असे मृत विवाहित युवतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय […]
देश
पत्नीने माजी सैनिक पतीच्या छातीत खुपसला चाकू अन् घेतला जीव; कारण समोर…
by टीम पोलिसकाकाअहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथील एका महिलेने आपल्या माजी सैनिक पतीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप खराडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते निवृत सैनिक होते. सैन्यातून निवृत झाल्यानंतर ते चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नीचे नाव निर्मला असे आहे. ते आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. दिलीप आणि […]
दिल्लीतील चावडी बाजारमध्ये इमारत कोसळल्याने दोन जण मृत्यूमुखी तर दोन जखमी; कंत्राटदारांना अटक…
by टीम पोलिसकाकानवी दिल्ली: दिल्लीच्या चावडी बाजार परिसरातील शीश महल गल्लीमध्ये बांधकाम चालू असलेली तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी फरिदाबाद येथील तीन कंत्राटदारांना अटक केली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख सिराज, ताजुद्दीन आणि फुरकान अशी पटवली आहे. त्यांना फरिदाबादच्या दावज तहसीलमधील सिरोही गावातून पकडण्यात […]
अट्टल गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात पाटणा जिल्ह्यात ३ अट्टल गुन्हेगार ठार; ठाणे अंमलदार जखमी…
by टीम पोलिसकाकापाटणा: बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मानेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर येथे गंगा नदीजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत, तीन अट्टल गुन्हेगार ठार झाले. या चकमकीत मानेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार (एसएचओ) रजनीश कुमार यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. पाटणा विशेष कृती दल (एसटीएफ) आणि पाटणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान मानेर येथे चकमक झाली. जखमी झालेल्या तिन्ही संशयितांना रुग्णालयात नेण्यात […]
मानवी क्रौर्याची परिसीमा; कॅब चालकाने केली पत्नी, मुलासह सासरच्या ७ जणांची निर्घृण हत्या; नंतर त्याने काय केले…
by टीम पोलिसकाकाबंगळुरूः येथील एका कॅब चालकाने आपल्या पत्नीसह मुलगा आणि तिच्या कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांना आतापर्यंत केवळ त्याच्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित सहा पीडितांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंदुशेखर याने पत्नी सुनीतासोबत वारंवार होणारे वाद आणि तिच्या कुटुंबाबद्दलच्या नाराजीमुळे हे हत्याकांड केले. सुनीताचा […]
विदेश
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीने पत्नीच्या आत्महत्येनंतर केले तिच्या शरीराचे तुकडे; पुढे काय झाले…
by टीम पोलिसकाकावॉशिंग्टन: पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने मृतदेहाचे तुकडे केले होते, अशी साक्ष अमेरिकेतील व्हर्जिनिया न्यायालयात देण्यात आली. भारतीय वंशाच्या नरेश भट याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. साक्ष देताना भट याने न्यायालयात सांगितले, की त्याची पत्नी ममता भट हिने आत्महत्या केली आहे. ममताने गोळ्या आणि अत्यंत विषारी कीटकनाशक सेवन केल्यानंतर, ती पलंगाशेजारी उलट्यांनी माखलेल्या अवस्थेत बेशुद्धावस्थेत […]
व्यापारी जहाजावरील हल्ल्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय खलाशाचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध
by टीम पोलिसकाकानवी दिल्ली: ओमानच्या लिमाहजवळ ‘एमएसव्ही अल जुसुफी’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, परराष्ट्र मंत्रालयाने निषेध व्यक्त केला आहे. तणाव कमी करण्याबाबत यापूर्वी केलेल्या आवाहनाचा परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला. प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की हल्ला झालेल्या जहाजावर १४ भारतीय खलाशी होते. भारतीय खलाशांपैकी १३ जणांची सुटका करण्यात आली […]
नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ उंचीवरील वाहतूक केंद्रावर उतरताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर, एकाचा मृत्यू…
by टीम पोलिसकाकानवी दिल्ली: नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळील एका उंच हवाई वाहतूक केंद्रावर उतरत असताना दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी एका पोस्टद्वारे दिली आहे. मृताची ओळख वसंत कुमार बलरामरामडू (वय ४७) अशी पटली असून, ते भारतीय नागरिक होते, असे या वृत्तात म्हटले आहे. ते चेन्नईचे रहिवासी होते. स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा […]
बांगलादेश सीमेवर बीएसएफ जवानांवर त्रिपुरामध्ये हल्ला; शस्त्रांची लूट; कंपनी कमांडरसह ४ जण जखमी…
by टीम पोलिसकाकाआगरतळा: त्रिपुरातील सेपाहिताला येथील बॉक्सानगरमधील आशाबारी येथे तस्करांच्या एका गटाने, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तीन जवानांवर हल्ला केला. त्यांनी बीएसएफ जवानांना निर्दयपणे मारहाण केली आणि त्यांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला. तस्करांनी एका सरकारी वाहनाचीही तोडफोड केली. या हल्ल्यात कंपनी कमांडर रोहित आणि इतर तीन बीएसएफ जवान जखमी झाले आहेत. […]
कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर विमान कोसळले, डॅशकॅम व्हीडिओमध्ये चित्रबद्ध; ३ प्रवासी थोडक्यात बचावले…
by टीम पोलिसकाकावॉशिंग्टन: कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे अत्यंत कमी उंचीवरून उडणारे एक छोटे विमान थेट रस्त्यावर कोसळल्याने, द्रुतगती मार्गावर घबराट पसरली. सुदैवाने वैमानिकासह अन्य दोन प्रवासी सुखरूप बचावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका गाडीच्या डॅशकॅममध्ये चित्रित झालेल्या या भीषण अपघातात, विमानाचा पंख रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला धडकला आणि विमान रस्त्यावर पालथे पडले. सुदैवाने, […]
पोलिस खाते
‘पोलिसकाका’च्या बातमीचा परिणाम! पुणे पोलीस आयुक्तालयात दिवाळी गिफ्ट आणण्यास बंदी…
पुणे (संतोष धायबर) : पुणे पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असताना दिवाळीच्या शुभेच्छांच्या नावाखाली गिफ्ट घेऊन येणाऱ्या अभ्यागतांचे मात्र स्वागत होत असल्याचा गंभीर प्रकार ‘पोलिसकाका’ने उघडकीस आणला होता. या बातमीची दखल घेत पुणे पोलीस आयुक्तालयाने आता दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट स्वीकारण्यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. पोलिसकाकाचे संपादक संतोष धायबर […]

