पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणात क्राईम ब्रांचने आणखी काही खुलासे केले आहेत. पॉर्श गाडीने चिरडून दोघांचा बळी घेणाऱ्या या अल्पवयीन आरोपीने 12 वी पास झाल्यामुळे मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी या पार्टीत दारू प्यायली, तर मुलगा बारावी पास झाल्यामुळे त्याचे आई-वडीलही अज्ञात ठिकाणी पार्टी करत होते. मुलाचे वडील विशाल अगरवाल याने मुलगा 12वी पास झाल्याबद्दल 2 कोटी रुपयांची पॉर्शे कार गिफ्ट दिल्याची माहिती पुढे आली आहे.

अल्पवयीन आरोपीचा 18 मे रोजी इंटरमीडिएट (प्लस+2) निकाल लागला होता, यात त्याला 60 टक्के मार्क मिळाले होते. एवढे मार्क मिळाल्याने खूश झालेला अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत बारमध्ये पार्टी करायला गेला. 18 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत घरातून निघाला आणि थेट कॉईज पबमध्ये गेला. इकडे त्यांची पार्टी रात्री 12.15 पर्यंत चालली, सगळ्या मित्रांनी दारू प्यायली. या पार्टीचे बिल जवळपास 48 हजार रुपये झाले, हे पैसे अल्पवयीन आरोपीने भरले. यानंतर सगळे मित्र 12.15 वाजता ब्लॅक पबमध्ये गेले आणि तिथेही त्यांनी हजारो रुपयांची दारू प्यायली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

रविवारी (ता. १९) रात्री 1.30 वाजता भयंकर नशेत बेदरकारपणे गाडी चालवत तो घरी निघाला, तेव्हा कल्याणी नगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना त्याने चिरडले. याप्रकरणी आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला कोर्टाकडून काही तासांमध्ये जामीन मिळाला, पण यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी गुन्हा गंभीर असल्यामुळे आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी कोर्टात केली आहे. याप्रकरणी आता अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून, त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारला झालेल्या अपघातावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अल्पवयीन आरोपीचा वडील बिल्डर विशाल अगरवाल याने देखील त्याच्या जबाबत असाच दावा केल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह तीन आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!