पुणे ! स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे दागीने चोरणारी महिला जेरबंद…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) मधील फिर्यादी हे दि.०५/०९/२०२५ रोजी एसटी क्रमांक MH-40 N-9340 फलटण ते पुणे प्रवास करण्यासाठी बसले त्यावेळी त्यांचे गळ्यातील सोन्यांचे गंठण तुटले. त्यांचे शेजारी बसलेल्या अनोळखी मुलीने व त्यांची भाची हिने गाडीमध्ये पडलेले मणी गोळा करून दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचेकडील असलेले सोन्याचे दागिने हे त्यांचे छोटया पर्समध्ये ठेवून ते मोठ्या बॅगमध्ये ठेवले होते. बस ही स्वारगेट बस स्टॅण्डमध्ये आली असता त्या अनोळखी मुलीने फिर्यादी यांना “मणी खाली पडले आहेत का पहा” असे सांगून फिर्यादी सिटखाली पाहत असताना त्यावेळेचा फायदा घेवून फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने असलेली छोटी पर्स चोरी केली होती. त्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील अनोळखी महिलेचा शोध घेणेकामी यशवंत निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील व पोउपनिरी रविंद्र कस्पटे यांनी तपास पथकातील हर्षल शिंदे व सुजय पवार यांना स्वारगेट एसटी स्टॅन्डचे सीसीटिव्ही फुटेज पाहणेबाबत आदेश दिले. त्यावरुन हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरुन एक तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला घटनेच्या वेळी संशयास्पद दिसुन आली. सदर संशयित महिलेचे व्यवस्थित फुटेज मिळणेकामी हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी वरिष्ठांचे परवानगीने फलटण, बारामती, कर्जत, राशीन, जामखेड, पाटोदा व बीड एसटी स्टॅन्ड याठिकाणांवरील जवळ-जवळ २०० ते ३०० सीसीटिव्ही फुटेज पाहुन सदर आरोपीचा व्यवस्थितीत वर्णनाचा फोटो प्राप्त केला. सदर फोटोमधील महिलेस फिर्यादी व साक्षीदार यांनी खात्रीने ओळखले.

सदर फोटो मधील महिलेचा शोध सुरू असताना २०/०९/२०२५ रोजी सदर महिला ही करमाळा एसटी स्टॅन्ड येथे आली असल्याची बातमी मिळाली, वरिष्ठांचे परवानगीने करमाळा येथे जावून महिला अश्विनी अविनाश भोसले (वय २७ वर्षे रा. गणगेवाडी माही जळगांव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेतले. सदर महिलेस तपासअंती अटक करुन तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासा दरम्यान जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही राजेश बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलींद मोहिते साो, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर, राहुल आवारे, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, विकास भारमळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा. अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, म.पो.हवा. स्मिता सिताप, पोलिस अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संग्राम केंद्रे, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, संदीप घुले, हनुमंत दुधे, म. पो/अं जयश्री हंडाळ, रेश्मा साळुंखे व नोबिता देसाई यांनी एकत्र मिळुन केली आहे.

पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Makeupartist (@hankare.shweta)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!