
मुग्धा लंडनहून गुपचूप आली पुण्यात अन् मृत्यू; चक्रावून सोडणारा घटनाक्रम…
पुणे: लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४) या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले, ज्यामध्ये भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगीसारख्या ॲप्सवर तिचे क्रेडिट कार्ड वापरले गेल्याचे स्पष्ट झाले. ती भारतातच असल्याचे निश्चित झाल्यावर पालकांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तांत्रिक तपासात तिचे लोकेशन गहुंजे येथील सोसायटीमध्ये दाखवले, जिथे बनावट चावीने फ्लॅट उघडला असता तिचा मृतदेह सापडला. शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
मुग्धा आणि आईचं शेवटचं बोलणं 23 ऑक्टोबरच्या रात्री झालं. मी थोडी घाईत आहे, मला जॉब इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यामुळं आत्ता फोन ठेवते, असं सांगून तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी मुग्धाने आई, वडिल, भाऊ, बहीण, नातेवाईक अन मित्रांचा कोणाचाचं फोन उचलला नाही. काही वेळाने तर फोन स्विच ऑफ झाला होता. आई-वडिलांनी 27 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशन गाठलं. मुग्धाचं अपहरण झाल्याचा गुन्हा त्यांनी दाखल केला. आई-वडिलांनी वरील सर्व घटनाक्रम आणि बँकेच्या खात्याची माहिती पोलिसांना दिली. त्याआधारे तांत्रिक तपास करुन मुग्धाचं लोकेशन ट्रेस करण्यात आले. ती पुण्याच्या लगत असलेल्या गहूंजे येथील उच्चभ्रू लोढा सोसायटीत असल्याची खात्री पटली. आई-वडिलांनी घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पोलिस पुण्यात दाखल झाले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलिसांना याबाबत कळवलं. मग त्याचं रात्री अकराच्या सुमारास पोलीस आई-वाडीलांसह लोढा सोसायटीत पोहचले. फ्लॅट आतून लॉक होता, डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी की-मेकरला बोलवण्यात आलं. त्याने चावी बनवली, फ्लॅटचं दार उघडलं अन आता प्रवेश करताच दुर्गंधीचा वास आला, पुढं येऊन पाहिलं तर बेडवर एका अंगावर कुजलेल्या अवस्थेत लेकीचा मृतदेह पडला होता. हे पाहून आई-वडिलांच्या पायाखालची मोठा धक्का बसला होता.
ऑगस्टमध्ये लंडन सोडलेली मुग्धाने हा फ्लॅट एप्रिल 2026 मध्ये भाड्याने घेतला, तसं ऍग्रिमेंट ही फ्लॅटच्या मालकाकडून प्राप्त झाले. पण ती इथं एकटीच राहायची, सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला सहसा प्रवेश मिळणं कठीणचं आहे. सुरक्षा रक्षक आणि शेजारच्यांकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणी येत होतं? किंवा तिच्या फोन हिस्ट्रीमधून ती फार कोणाच्या संपर्कात होती? असं ही काही आढळलं नाही. घराची झडती घेतली तर संशयास्पद ही काही आढळलं नाही. शवविच्छेदन अहवालात ही शरीरावर कोणत्या इजा दिसून आल्या नाहीत. पण खबरदारी म्हणून व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळं मुग्धाचा मृत्यू अटॅकमुळं झाला असावा? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणाने देशमुख कुटुंबीय हादरून गेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुग्धा लंडनमध्येच असल्याचे भासवत होती; पुण्यात आढळला मृतदेह…
नवविवाहितेचे लग्नानंतर दोघांसोबत प्रेमसंबंध; दोघांना एकत्र बोलावले अन्…
हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीची आठ पानांची चिठ्ठी; तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा…
नाशिकमध्ये भोंदूबाबाने आश्रमातच ओलांडली मर्यादा; महिलेवर लैंगिक अत्याचार…
अहिल्यानगर! पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अन् दोघांना पकडले रंगेहाथ…

