
पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…
पुणे: पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पायल अक्षय झांबरे (वय २९) असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायल यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीतील जुन्या फ्लॅटमध्ये पायल यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आज (सोमवार) आढळून आला. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पायल या एका IT कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी सुमारे पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आला असून, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे.
View this post on Instagram
पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या काळात दरवर्षी 5 ते 10 तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदा माहेरच्या कुटुंबीयांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार देत पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही पायल यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच राहिला, असा आरोप पवार यांनी केला आहे. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पायल पवार झांबरे या पुण्यातील नामांकित झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबातील सून असल्याची माहिती समोर आली आहे. पायल यांच्या आत्महत्येची बातमी समजताच त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी महर्षी नगर परिसरातील झांबरे पॅलेस येथे धाव घेतली. संतप्त नातेवाईक आणि जमावाने झांबरे पॅलेसवर हल्ला करत तेथील साहित्याची तोडफोड केली. झांबरे पॅलेस हे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अत्यंत प्रसिद्ध आणि मोठे मंगल कार्यालय असून, येथे नियमितपणे लग्नकार्ये आणि इतर भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. भरदिवसा झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या झांबरे पॅलेस आणि मुकुंद नगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

