पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती घेण्यास नकार…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील 142 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. पण, महाराष्ट्रातील सुमारे 38 जणांनी वेगवेगळी वैयक्तिक कारणे देऊन पदोन्नती घेण्यास नकार दिला आहे.

मुलांच्या शालेय शिक्षणाबाबतची चिंता, वैयक्तिक आरोग्याच्या समस्या आणि त्यांची पदोन्नती पुढे ढकलली जावी यासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यात जाणीवपूर्वक होणारा विलंब ही कारणे आहेत. वेगवेगळी कारणं सध्या समोर येत असली तरी नेमकं कशामुळे पोलिस आयुक्त पदोन्नती घेण्यास नकार देत आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून राहण्यापेक्षा आहे त्या ठिकाणीच राहणे जास्त चांगले असते, असा विचार अनेकजण करतात. त्यामुळे ते पदोन्नती घेण्यास नकार देतात. वरिष्ठ पोलिस निरीक्षक (PI) हे पद सर्वात प्रभावशाली मानली जाते. पोलिस स्टेशन ताब्यात असेल तर सहाय्यक पोलिस आयुक्तपदापेक्षा तेथे मोठ्या प्रमाणात काम करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देता येतो. शिवाय, अनेक जण निवृत्तीपर्यंत या पदावर राहण्याची आकांक्षा बाळगतात. एसीपीच्या भूमिकेत पदोन्नतीमुळे वाढीव पगार आणि उच्च निवृत्तीवेतन लाभ मिळतात. परंतु हे पद आता ‘साइड-पोस्टिंग’ म्हणून मानले जाते. शिवाय, मुलांचे शिक्षण, कुटुंब आणि बदली होऊन दुसरीकडे जाण्यापेक्षा आहे त्या ठिकाणीच राहणे अनेकजण पसंत करतात.

दरम्यान, सरकारी नियम आणि पोलिस परिपत्रकानुसार अधिकाऱ्यांना पदोन्नती नाकारण्याचा अधिकार आहे. तसेच, नियमांमध्ये असेही नमूद केले आहे की जे अधिकारी पदोन्नती नाकारतात त्यांना वेगळ्या पदावर बदली करणे आवश्यक आहे आणि एसीपी पदोन्नती नाकारल्यानंतरही त्यांना त्याच पदावर ठेवण्याची परवानगी नाही. पण, यामधील काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याने पदोन्नती अपात्र ठरवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!