हृदयद्रावक! लग्नानंतर वर्षभरातच चारित्र्यावर संशय, गर्भवती महिलेने उचललं मोठं पाऊल…

छत्रपती संभाजीनगर : एका गर्भवती नवविवाहितेने कौटुंबिक कलह आणि चारित्र्याच्या संशयामुळे स्वतःच्या माहेरच्या घराच्या गच्चीवरून खाली उडी मारून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान या तरुण विवाहितेसह तिच्या पोटातील बालकाचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी माहेरच्या लोकांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सोनू विनोद राठोड (वय १९, रा. मुकुंदवाडी, मूळ रा. सातारा परिसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पती विनोद विलास राठोड (वय २६), सासू सुनिता विलास राठोड (वय ४५), दीर विशाल राठोड (वय २४), मावसा सुभाष (वय ४५) आणि मावशी पिनाबाई सुभाष राठोड (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सोनूचा विवाह १२ जून २०२५ रोजी विनोद विलास राठोड (वय २६, रा. मुकुंदवाडी) याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही कालावधीतच पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्याविषयी संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. सोनू चार महिन्यांची गर्भवती असतानाही तिचा हा त्रास सुरूच होता. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री तिचा पती विनोद तिला भेटण्यासाठी माहेरी आला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरी गेला आणि पुन्हा दिड वाजता माहेरी परत आला. त्यानंतर रात्री साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास सोनू आणि तिचा पती दोघेही घराच्या गच्चीवर गप्पा मारत बसले होते. दरम्यान, त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि काही वेळातच गच्चीवरून खाली काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला.

घरच्यांनी बाहेर धाव घेतली असता सोनू रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. तिचे वडील रमेश दासू चव्हाण यांनी तिला तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २७ ऑक्टोबरला तिच्या पोटातील बाळ दगावले, तर २९ ऑक्टोबरला उपचारादरम्यान सोनुचीही प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील रमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींवर सातारा पोलीस ठाण्यात सातारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पती विनोद आणि सासू सुनिता यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीने मुलासह संपवलं जीवन, चिठ्ठी वाचून मन सुन्न…

हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…

हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…

हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…

हृदयद्रावक! मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आईनेही मारली उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!