
काजल शर्मा हिचे ज्येष्ठ नागरिकासोबत चॅटिंग, नग्न व्हिडिओ कॉल अन् शेवटी…
मुंबई : एका अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं एका निवृत्त व्यक्तीला महागात पडले आहे. ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १५ लाख २८ हजार ७५० रुपयांची फसवणूक झाली असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
कांजूरमार्ग परिसरात राहणारे ६३ वर्षीय तक्रारदार २०१४ साली खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. १० ऑगस्ट २०२६ रोजी फेसबुक वर काजल शर्मा नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताच काजलने त्यांना आपला व्हॉट्सॲप नंबर दिला आणि दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. काजलने एकदा त्यांना व्हिडिओ कॉल केला. यानंतर स्वतःचा नग्न व्हिडिओ दाखवला आणि ज्येष्ठालाही नग्न होण्यास भाग पाडले. तिने यानंतर त्या ज्येष्ठाला फोन केला आणि ते नग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचे सांगितले.
View this post on Instagram
६ ऑक्टोबर रोजी संदीप कुमार नावाच्या व्यक्तीने फोन करून आपण दिल्ली पोलिस निरीक्षक असल्याचे सांगितले. ज्येष्ठाचे अश्लील व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड होत असून ते हटवण्यासाठी यूट्यूब कर्मचारी राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. यानंतर राहुल शर्मा याने यूट्यूब आणि अन्य समाजमाध्यमांवरील व्हिडीओ हटवण्यासाठी २ लाख ६३ हजार खर्च सांगितला. यानंतर १३ ऑक्टोबर रोजी ‘विक्रम राठोड’ नावाच्या व्यक्तीने जयपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक असल्याचं सांगून धमकावले. भामट्यांनी त्यांना वेगवेगळी कारणं सांगून धमकी देत तब्बल १५ लाख २८ हजार ७५० रुपयांचा गंडा घातला. अखेर ज्येष्ठाने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मुख्याध्यापकाचा नग्न अवस्थेत विद्यार्थिनींसोबत अंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल अन्…
नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…
कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ…

