
नवविवाहितेचे लग्नानंतर दोघांसोबत प्रेमसंबंध; दोघांना एकत्र बोलावले अन्…
हैद्राबाद (तेलंगणा): एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी पतीचा मृतदेह एका तलावात फेकला होता. तसेच हा अपघाती मृत्यू असल्याचं भासवलं होतं. मात्र पोलिसांनी आरोपी महिलेचं बिंग फोडले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या दोन्ही प्रियकरांना बेड्या ठोकल्या आहेत.
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका महिलेने (वय २५) तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीने स्वतःच्या पतीची निर्घृण हत्या केली. गुम्माडी काशीराम (वय २६) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. २३ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री गावाच्या वेशीवरील ‘पचेरा चेरुवू’ तलावात त्याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासात पोलिसांना काही संशय निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाला हत्येच्या गुन्ह्यात बदलले.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीरामची पत्नी गुम्माडी सविता (वय २५) हिचे गावातीलच दोन तरुण चिंताकिंडी रामू (वय २६) आणि पसुपूला संतोष (वय २५) यांच्याशी अनैतिक संबंध होते. सविताला तिच्या पतीचा कायमचा काटा काढायचा होता, म्हणूनच तिने तिच्या दोन्ही प्रियकरांना हाताशी धरून पतीच्या हत्येचा कट रचला. २३ ऑक्टोबरच्या रात्री आरोपींनी ठरलेल्या कटानुसार काशीरामला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले. काशीराम जेव्हा दारूच्या नशेने पूर्णपणे धुंद झाल्यानंतर गळा आवळून खून केला. हत्या केल्यानंतर तिघांनी मृतदेह तलावात फेकून दिला, जेणेकरून ही बुडून झालेली दुर्घटना वाटेल. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासामुळे हा बनाव उघडा पडला.
पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी कारवाई करत पत्नी सविता आणि तिच्या दोन्ही प्रियकरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पत्नीचे जीम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध; पहाटे प्रियकराला घरी बोलवलं अन्..
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर संतापाचा कळस! भररस्त्यात नग्न धिंड अन्…
दोन मुलांच्या आईला नवऱ्याने भररस्त्यात प्रियकरासोबत पकडले; मिठी मारली अन्…
बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…
नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…

