Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…

मुंबईः मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण, गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. संबंधित वृत्तही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. शिवाय, दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सध्या केला जात आहे. सोशल मीडियावरही विविध मेसेजेस फिरत आहेत. गणरायाच्या मंडपात सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात असतात. पण गर्दीचा रेटा प्रचंड असल्यामुळे गर्दी नियंत्रित करणे केवळ अशक्य असते.

लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडत असल्याचे ऐकायला मिळते. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की यांसारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय, लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी अनेक व्हीआयपी येत असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दीड दिवसांच्या गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू…

Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!