
पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…
पुणे : एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पायाला दगड बांधून तळ्यात फेकून दिला होता. पुणे जिल्ह्यातील मुळशीतील दुधाळे वस्ती येथून अचानक गायब झालेल्या युवकाचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या भयानक हत्याकांडाचा तपास करत बावधन पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येमाग अतिशय धक्कादायक कारण समोर आलं आहे.लुटमारीच्या उद्देशानं या तरुणाचा इतक्या निर्घृणपणे जीव घेतला गेला.
मुळशीतील दुधाळे वस्ती येथे राहणारा महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, मूळ रा. छत्तीसगड) हा युवक ३० ऑगस्टच्या रात्री अचानक घरातून गायब झाला होता. तो परत न आल्याने त्याच्यापत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिस शोध घेत असतानाच २ सप्टेंबर रोजी लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात एका युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांना मृतदेह बाहेर काढला. युवकाचे हात-पाय टी-शर्टने घट्ट बांधलेले होते आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्याच्या पायाला वजनदार दगड बांधला होता.
View this post on Instagram
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने लुटमारीच्या हेतूने साथीदारासह मिळून महेंद्रकुमारचा जीव घेतल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ राज साधन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, दिल्ली) याला अटक केली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
आरोपीने लुटमारीच्या उद्देशाने हा हत्याकांड घडवला असून लुटीची रक्कम जप्त करणे आणि हत्येचा मुख्य हेतू शोधणे बाकी आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी न्यायालयात आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या पतीला कळले अन्…
पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…

