मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

राज्याच्या पोलिस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन 15 हजार पदांची पोलिस भरती करण्यात येत आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. दरम्यान, गेल्या 2-3 वर्षांपासून पोलिस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे.

शासन परिपत्रकात काय म्हटले पाहा…
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नुसार सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”, असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे, 2022 ते 2025 या 4 वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

भरण्यात येणारी पदांची संख्या खालीलप्रमाणे
– पोलिस शिपाई – 10 हजार 908
– पोलिस शिपाई चालक – 234
– बॅण्डस् मॅन – 25
– सशस्त्री पोलिस शिपाई – 2,393
– कारागृह शिपाई – 554

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; शासन निर्णय प्रसिद्ध…

महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…

मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…

राज्यात ऑक्टोबरमध्ये होणार १० हजार पोलिसांची भरती…

भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!