
प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस सभासदांची ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ ही सोसायटी आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशांत शिंदे यांनी सांभाळली आहे. पोलिस सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आणि उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी अशी श्री. शिंदे यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…
प्रशांत शिंदे यांचे दौंड तालुक्यातील राहू हे गाव. वडील पुणे पोलिस दलात असल्यामुळे त्यांचे बालपण आणि शिक्षण पुणे शहरात झाले. लहानपणापासून मैदानी खेळाची आवड. पुणे शहर पोलिस दलात गेल्या २९ वर्षांपासून काम करत असताना १०० हून अधिक बक्षिसे मिळवली आहेत. पोलिस दलातील प्रत्येकाशी त्यांनी अगदी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. पोलिसांसाठी असलेल्या सोसायटीसाठी प्रथमच २००६ मध्ये निवडणूक लढविली आणि निवडून आले. साडेसहाशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सोसायटीचे ते सध्या अध्यक्ष आहेत. पोलिस दलात काम करत असलेल्या सहकाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे अध्यक्ष म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. पोलिस सहकाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रगतीचा ध्यास घेऊन ते रात्रंदिवस काम करत आहेत.
बालपण…
प्रशांत शिंदे यांचे वडील पुणे शहर पोलिस दलात कार्यरत होते. पोलिस उपनिरीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना पोलिस दलाचे आकर्षण होते. एकत्र कुटुंब आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोमवार पेठेत व भवानी पेठ पोलिसलाइन येथे त्यांचे बालपण गेले. लहानपणापासून मैदानी खेळाची आवड होती. सुट्टीचा संपूर्ण दिवस मैदानावर घालवत. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा खेळ. परंतु, मैदानावर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा त्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला आहे. अगदी विद्यापीठ पातळीपर्यंत जाऊन ते क्रिकेट खेळले आहेत. लहानपणापासून खेळ खेळल्यामुळे शरीर आजही सुदृढ आहे.
सार्वजनिक उत्सावाची आवड…
प्रशांत शिंदे यांना लहानपणापासून सार्वजनिक उत्साहाची आवड होती. विविध उत्सवांमध्ये ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत. विद्यार्थिदशेत म्हणजेच इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असल्यापासून ते आजपर्यंत अखिल भवानी पेठ पोलिसलाइन मित्र मंडळाचे कामकाज पाहत आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी गेल्या ४०-४५ वर्षांपासून झोकून देऊन काम करत आहेत. स्वाभाविकच त्यांचा मित्र-परिवारसुद्धा मोठा आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि पुढाकार घेऊन काम करण्याची सवय त्यांना लहानपणापासून लागली आहे. सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळत असताना अनेकांना त्याचा अनुभव येत आहे. रात्री-अपरात्री ते सहकाऱ्यांच्या मदतीसाठी धावून जातात.
शिक्षण…
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण राजा धनराज हायस्कूल, रास्ता पेठ, पुणे (आरडी) शाळेत झाले. ११वी, १२वी कॅम्प एज्युकेशन सोसायटी, तर पुढील शिक्षण गरवारे आणि पुणे विद्यापीठामधून झाले. पदवी प्राप्त केल्यानंतर वकिली आणि एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती त्या वेळी नाजूक असल्यामुळे वडिलांनी पोलिस दलात भरती होण्याचा सल्ला दिला आणि पहिल्या प्रयत्नातच म्हणजे १९९५ मध्ये ते पोलिस दलात भरती झाले.
पोलिस दलातील सेवाकाळ…
१९९५ ते १९९६ – प्रशिक्षण (जालना)
१६९६ ते २००२ – पुणे शहर मुख्यालय
२००३ ते २००८ – गुन्हे प्रतिबंधक विभाग
२००८ ते २०१३ – पुणे शहर मुख्यालय
२०१३ ते २०२१ – गुन्हे प्रतिबंधक विभाग
२०२१ ते २०२२ – शिवाजीनगर पोलिस स्टेशन
२०२२ ते २०२३ – नियंत्रण कक्ष (पोलिस हवालदार)
१००हून अधिक बक्षिसे…
प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात उत्कष्ट काम केल्यामुळे १००हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली एखादी महत्त्वाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने पूर्ण करतात. दोन-तीन दिवस घरी न जाता चोख कामगिरी बजावली आहे. एकदा तर रुग्णालयात अॅडमिट असतानाही कामाची गरज ओळखून ते पूर्ण करण्यासाठी बाहेर आले आणि परत रुग्णालयात दाखल झाले होते. यावरूनच कामाची तळमळ दिसून येते. पोलिस दलात गेल्या २९ वर्षांमध्ये काम केल्याचे मोठे समाधान आहे, असे प्रशांत शिंदे सांगतात.
सोसायटीची निवडणूक…
प्रशांत शिंदे यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे. एका सहकारी मित्राने सोसायटीची निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता. यामुळे २००६ साली निवडणूक लढविण्याचे त्यांनी ठरविले…
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

