विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

विलास सोंडे हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म. लहानपणापासूनच पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. दांडगा जनसंपर्क आणि पोलिस दलातील दांडगा अनुभव असल्यामुळे विविध गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…

विलास सोंडे यांचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हे गाव. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील सरकारी नोकरीत, तर आपणही सरकारी अधिकारी व्हावे, अशी त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती. शिक्रापूर येथून पुढील शिक्षणासाठी पुणे शहरात दाखल झाले आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यश मिळवले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवाया करताना अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामुळे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. वरिष्ठांचा विश्वास आणि गुन्हे उघड करण्याची कला आत्मसात असल्यामुळे त्यांनी विविध गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.

शिक्षण…
विलास सोंडे यांचे प्राथमिक शिक्षण कोंढापुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. अकरावी आणि बारावी विद्याधाम प्रशाला, शिरूर येथून पूर्ण केले. बारावीनंतरचे पुढील शिक्षण शिरूर तालुक्यात त्या वेळी नसल्यामुळे त्यांनी पुणे शहरात जाण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरात होस्टेलमध्ये राहून कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच त्यांनी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली होती. शिवाय, बी प्लॅन म्हणून वकिलीसाठी प्रवेश घेतला होता. लष्करात जाऊन देशसेवा किंवा पोलिस दल अथवा समाजकारणामध्ये राहून सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याचे ठरवले होते. यामुळे पुढे जाऊन काय करावे? याबाबत फारशी अडचण त्यांना आली नाही.

समाजकारण…
विलास सोंडे यांना लहानपणापासून समाजकारणाची आवड होती. शिक्रापूरसह शिरूर तालुक्यातील नागरिकांना विविध कामांमध्ये मदत करत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढत होता. नागरिकांची कामे करू लागल्यामुळे राजकारणात येऊन लोकप्रतिनिधी व्हावे, अशी नागरिकांची इच्छा होती. पण, त्यांनी लष्करात किंवा पोलिस दलात येऊन अधिकारी होण्याचे ठरवले होते. नोकरीच्या माध्यमातूनही समाजसेवा करता येऊ शकते, त्यामुळे नोकरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

स्पर्धा परीक्षा…
मोठा भाऊ पोलिस अधिकारी असल्यामुळे भावाप्रमाणे आपणही पोलिस अधिकारी होण्याचे ठरवले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रथम स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर अपयश आले. पण, यामधून खूप काही शिकायला मिळाले होते. पुढील वेळी नक्कीच उत्तीर्ण होऊ, असा आत्मविश्वास आला होता. अभ्यास सुरूच होता. पुढच्या वेळी परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. कुटुंबीयांसह त्यांना मोठा आनंद झाला होता. पोलिस दलामध्ये राहून देशसेवेसह सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देता येणार होता. शिवाय, समाजकारणही होणार होते. यामुळे स्वप्न साकार झाले होते. १९९५ साली ते पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले.

मुंबईमधील अनुभव…
नाशिक येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे नियुक्ती झाली होती. मुंबईमध्ये पाच वर्षे काम केल्यामुळे मोठा अनुभव मिळाला होता. मुंबई पोलिस दलात राहून खूप काही शिकायला मिळाले. मुंबईतील गुन्हेगारांना सरळ करण्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करता आले. विविध गुन्हे हाताळायला मिळाले. मुंबईत नोकरीच्या सुरुवातीलाच काम करता आल्यामुळे पाया भक्कम झाला होता. यामुळे पुढे विविध ठिकाणी काम करत असताना अनेक गुन्हे उघड करायला मदत झाली, असे विलास सोंडे सांगतात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!