
बारामतीतील उद्योजकाने घडवून आणला स्वतःवरच हल्ला; खळबळजनक खुलासा समोर…
बारामती : बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. मंत्र्यांना आणि अतिमहत्त्वाच्या (VIP) व्यक्तींना जसे पोलीस संरक्षण मिळते, तशी ‘एस्कॉर्ट’ गाड्यांसह हाय-प्रोफाइल सुरक्षा मिळवण्याच्या हव्यासापोटी उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच जीवघेण्या हल्ल्याचा कट रचल्याचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे झालेल्या या कथित हल्ला प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक केली. आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर या संपूर्ण कटाचा उलगडा झाला असून, बारामती पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
‘राणा शिपिंग’चे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता बारामती एअरपोर्टजवळ गोजुबावी शिवारात हल्ला झाल्याची घटना घडली होती. राणा सूर्यवंशी हे आपल्या वैयक्तिक कामासाठी बारामतीत आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे खासगी बॉडीगार्डही होते. त्यावेळी स्कूटीवरून आलेल्या दोघांनी ‘आम्ही तुमचे फॅन आहोत’ असे सांगत त्यांना बुके देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार केले. यात ते जखमी झाल्याने त्यांना बारामतीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी यांनी यापूर्वी पैसे भरून पोलीस संरक्षण घेतले होते. मात्र, त्यांना केवळ पोलीस नव्हे तर थेट मंत्र्यांसारखा वाहनांचा ताफा आणि ‘एस्कॉर्ट’ गाड्यांसह व्हीआयपी दर्जाचे पोलीस संरक्षण हवे होते. शासकीय नियमानुसार अशा सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तीला असलेला संभाव्य धोका विचारात घेतला जातो. त्यामुळे आपल्याला धोका असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनीच स्वतःवर या हल्ल्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय 42, रा. सणसर, ता. इंदापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. लक्ष्मीकांत हे राणा सूर्यवंशी यांचे ड्रायव्हर आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे या दोघांना यापूर्वीच अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगर! पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अन् दोघांना पकडले रंगेहाथ…
शेतकऱ्याला फायनान्सवाले घेऊन गेले अन् मृतदेहच हाती; कुटुंबाचा गंभीर आरोप…
लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…
प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…
पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

