Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!

कराची (पाकिस्तान): कराची शहरातील गणेश मठ मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. पाकिस्तानमधील मराठी बांधव गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाही विविध भागांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

पाकिस्तानमध्ये कराचीत यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कराचीत गणेश चतुर्थीला गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले. कराचीत राहणारे प्राण सुरेश नाईक यांच्या घरी गणेशाचे धुमधडाक्यात आगमन झाले. यावेळी काही हिंदू भक्तांनी गणपतीची आरतीची केली. कराचीत राहणारे अनेक हिंदू कुटुंबीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

कराचीत गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद नसतो तर मोतीचूरचे लाडू आणि शिऱ्याचा प्रसाद दाखवला जातो. कराचीतील दिल्ली कॉलनी, मद्रासी पाडा, जिना कॉलीन, सोल्डर बाजार आणि क्लिफ्टॉन भागांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. दरवर्षी कराचीमध्ये गणरायाचे धुमधडाक्यात आगमन होते. काही जणांकडे दीड, पाच तर काहींकडे 11 दिवसांचे गणपती असतात.

कराचीत मोठ्या भक्ती भावात गणपतीची स्थापना करून पूजा आरती केली जाते. यावेळी हजारो हिंदू कुटुंबीय गणरायाच्या स्वागतासाठी गर्दी करतात. गणरायाच्या स्वागतासाठी देखावेही येथे तयार केले जातात. कराचीमधील मराठी कुटुंबातील लीला प्रकाश या 30 वर्षांपूर्वी लग्न होऊन पाकिस्तानात आल्या असून, पती आणि सासऱ्यांच्या इच्छेखातर कुटुंबाने हे मंदिर उभारल्याचे सांगतात. थोडक्यात, जगभरातील मराठी बांधव मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करत असून, गणेशोत्सव साजरा करताना दिसतात.

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!