कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री गँगवॉरमधून एका सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. महेश शिवाजी राख (वय २३, रा. अहिल्याबाई होळकर नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापुरात परतला होता. तो शहरात परतल्यानंतर काही तासांतच गंगाई लॉनजवळ सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी गजाचा वापर करत हल्ला चढवला. या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विश्वजीत फाले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींनी महेशच्या मित्राच्या घरावरही बिअर बाटल्या आणि दगडफेक करून नुकसान केले. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करवीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, ‘महेश राख याच्या खुनामागे वैयक्तिक सूड असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी आदित्य गवळी आणि महेश राख यांच्यात गवळीच्या पत्नीवरून वाद होता. महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. याच वैमनस्यातून आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मध्यरात्री हा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आदित्य गवळी, हर्षद गवळी, हर्षवर्धन शर्मा, शुभम साळोके उर्फ समर, पियुष कांबळे, पियुष पाटील आणि यशम कुटे यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…

कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…

कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…

हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!