नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

नितीन जगताप हे पुणे शहर पोलिस खात्यामध्ये गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहेत. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. गुन्हे शाखेमध्ये काम करताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. शिवाय, लहानपणापासून संगीत क्षेत्राची असलेली आवड त्यांनी आजही तेवढीच जपली असून, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली आहे. थोडक्यात, पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…

नितीन तुळशीराम जगताप यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर. नोकरीनिमित्त पुणे शहरात स्थायिक झाले. परंतु, गावची नाळ त्यांनी अद्यापही तोडलेली नाही. गावाविषयी असणारे प्रचंड प्रेम. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव. पोलिस खात्यामध्ये काम करत असताना खाकी वर्दीने खूप काही देताना त्यांची एक ओळख निर्माण करून दिली आहे. लहानपणापासून संगीत क्षेत्राची असलेली आवडही त्यांनी नोकरी करत असतानाही जोपासली आहे. पोलिस खाते आणि संगीत क्षेत्र हे भिन्न असले तरी दोन्ही गोष्टींमधून त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. गुन्हे कार्यप्रणाली केंद्रात (एमओबी) त्यांनी मोठे काम केले असून, दुसरीकडे संगीत विशारद ही पदवी सुद्धा मिळवली आहे.

बालपण…
नितीन जगताप यांचे बालपण बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) या गावात गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पहिली लढाई बेलसर या गावामध्ये जिंकली होती. एक इतिहास असलेल्या बेलसर गावामध्ये ते लहानाचे मोठे झाले. वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणपासूनच शिस्तीचे धडे गिरवले होते. गावामध्ये भजन, काकड रती चालायची. वयाच्या १२व्या वर्षांपासूनच त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. मोठे भाऊ तबला वाजवायचे तर नितीन जगताप हार्मोनिअमवर साथ देत असत. दोघेही भाऊ भजनामध्ये दंग होऊन जात. रात्री सुरू झालेली भजने पहाटे तीन वाजेपर्यंत चालायची. कुठे भजन असल्याचे समजले की, भजनातील सहकाऱ्यांसह ते रात्रीच्या अंधारातून कधी सायकलीवरून तर कधी बिनाचपलेने पायी चालत जाऊन भजनामध्ये दंग होत. लहानपणी आवड निर्माण झालेल्या भजन आणि संगीत क्षेत्राचा पुढे आयुष्यभर फायदा झाला आहे, असे नितीन जगताप सांगतात.

शिक्षण…
१ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण बालसिद्धनाथ विद्यालय, बेलसर येथे तर ११ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर (अकलूज, जि. सोलापूर) येथे झाले. पुढील शिक्षण सासवड येथील वाघेरे कॉलेज आणि भोर येथे झाले. शाळेमध्ये असतानाच खो-खो, हँडबॉल, फुटबॉल या मैदानी खेळांची आवड निर्माण झाली होती. १९८८मध्ये मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या शाळेकडून तालुका स्तरावर खेळत असताना त्यांनी शाळेस सुवर्णपदकासह सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शालेय स्तरावर हँडबॉल, फुटबॉल या खेळात गोलकिपर म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.

अध्यात्माची आवड…
नितीन जगताप यांना भजनाची आवड असल्यामुळे आपोआपच आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच शास्त्रीय संगीत क्षेत्राकडे ओढले गेले होते. कै. गुलाब खंडूजी यादव हे संगीतशिक्षक म्हणून त्यांचे पहिले गुरू. पुढे, स्वरानंद संगीत विद्यालय, सासवड येथे त्यांनी गायनाचे धडे घेतले. तेथे महाउपाध्याय कै. पंडित बोळंगे गुरुजी, पं. शिवाजी डिगोळे, पं. बाळासाहेब नारागुडे यांचे मार्गदर्शन लाभले. नोकरीनिमित्त पुणे शहरात आल्यानंतर ज्यांचे संगीत हेच जीवन बनलेले आहे असे गानतपस्वी पं. मुकुंद अनंत मराठे (पुणे) यांच्याकडे गायनाचे मार्गदर्शन घेत आहेत. गेल्या ४० वर्षांमध्ये असलेली अध्यात्माची आवड आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत २०२३मध्ये त्यांनी संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली आहे. पोलिस खात्यामध्ये नोकरी करत असताना संगीत शांत बसू देत नव्हते. संगीत क्षेत्रामधील सर्व परीक्षांत ते विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना असणारी गायनाची आवड त्यांची पत्नी सौ. रोहिणी यांनी ओळखून त्यांना प्रोत्साहान दिले. संगीत विशारद ही पदवी मिळविण्यामागचे श्रेय ते त्यांची धर्मपत्नी सौ. रोहिणीला जाते, असे नितीन जगताप अभिमानाने सांगतात.

मास्तराची पोरं आणि भजन…
नितीन जगताप यांना एक भाऊ सुनील आणि दोन बहिणी (सुचित्रा, सुरेखा). वडील शिक्षक आणि आई सौ. मालन या गृहिणी असल्यामुळे मुलांवर शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही घडले. दोघा भावांना भजन आणि संगीताची लहानपणापासूनच आवड निर्माण झाली होती. गावात किंवा परिसरात कोठे भजन असल्याचे समजले की ते आनंदाने जात. पण, दुसरीकडे मास्तराची पोरं आणि भजनं करतात, असे त्या वेळी त्यांना काही जण हिणवायचे. पण, त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. पुढे, त्यांनी पोलिस दलातील कर्तव्य बजावत संगीत क्षेत्रात संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली. आई-वडिलांना आपला मुलगा संगीत विशारद असल्याचे सांगताना अभिमान तर वाटतोच. पण, नावे ठेवणारे लोकही आता एका वेगळ्या नजरेने पाहायला लागले आहेत. आई-वडील, पत्नी रोहिणी आणि गुरूंमुळे हे शक्य झाले आहे, असे सांगताना नितीन जगताप यांना अभिमान वाटतो. नितीन जगताप यांनी शालेय जीवनामध्ये जिल्हा पातळीपर्यंत भजन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी अध्यात्माची आवड जोपासली आहे. पोलिस खात्यामधील नोकरी म्हटली, की एखादे व्यसन असणार असे समजले जाते. परंतु, नितीन जगताप हे गेल्या २९ वर्षांपासून नोकरी करत असून, आजपावेतो त्यांच्यापर्यंत कोणतेही व्यसन पोहोचलेले नाही. त्यांना व्यसन आहे ते फक्त काम आणि संगीत क्षेत्राचे.

पोलिसमध्ये भरती…
नितीन जगताप यांच्या कुटुंबाला पोलिस खात्याची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. नितीन हे शिक्षण आणि संगीत क्षेत्रात रमून गेले होते. एप्रिल १९९५ मध्ये एक दिवस पुणे शहरात पोलिस भरतीचा त्यांना कॉल आला….

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!