
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
चंद्रकांत खांडवी हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. आश्रमशाळेत राहून, दिव्यावर अभ्यास करून मोठे यश संपादन केले आहे. शाळेचे काम करत असताना आणि कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक म्हणून आठ वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले आहेत. दुसरीकडे पोलिस अधिकारी म्हणून विविध गुन्हे उघड केले आहेत. चंद्रकांत खांडवी यांच्या विषयी थोडक्यात माहिती…
चंद्रकांत खांडवी यांचा शेतकरी कुटुंबातील जन्म. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा हे गाव. गाव अगदी छोटे. डोंगर भागात गाव असल्यामुळे गावामध्ये वीज नाही. वाहतुकीची व्यवस्था नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली तर डोली करून घेऊन जायचे. यावरूनच गाव कसे असेल याचा अंदाज येतो. शेती हा प्रमुख व्यवसाय. कुटुंबाला पोलिस दलाची पार्श्वभूमी. चुलते पाडुंरग खांडवी आणि रामू खांडवी पोलिस दलात होते. चंद्रकांत खांडवी हे लहानपणापासूनच जिद्दी होते. गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे आश्रमशाळेत राहून शिक्षण पूर्ण केले. पुढे एमबीएपर्यंत मजल मारली. शिक्षक झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पोलिस दलात दाखल झाले. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना विविध गुन्हे उघड केले आहेत. याबद्दल त्यांना रोख रकमेसह प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षण…
१ ते ३री – जिल्हा परिषद शाळा रोकडपाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक
४ ते ७वी – शासकीय आश्रमशाळा सालभोये, ता. सुरगाणा, जि. नाशिक
८ ते १०वी – जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, नाशिक (आदिवासी वसतिगृह)
११ ते १२वी (सायन्स) – ज्यू. कॉलेज माणूर, ता. कळवण, जि. नाशिक
डीएड – डीएड कॉलेज, मनमाड, जि. नाशिक
बीए, एमए – पुणे विद्यापीठ
एमबीए – पुणे विद्यापीठ
पोलिस दलातील कार्यकाळ…
२०११ ते २०१२ – पोलिस उपअधीक्षक प्रशिक्षण, नाशिक
२०१२ ते २०१३ – परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, अमरावती जिल्हा
२०१३ ते २०१५ – पोलिस उपविभागीय अधिकारी, उदगीर, जि. लातूर
२०१५ ते २०१८ – पोलिस उपविभागीय अधिकारी, उमरगा, जि. लातूर
२०१९ ते २०२० – पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकेडमी, नाशिक
२०२० ते २०२२ – अति. पोलिस अधीक्षक, मालेगाव, नाशिक ग्रामीण
२०२२ ते २०२३ – पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, नाशिक शहर
२५ जुलै २०२३ पासून ते आजपर्यंत पोलिस उपायुक्त, मुख्यालय, नाशिक शहर.
पदक…
१) विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीत केलेल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांचेकडून ३१ प्रशंसापत्रे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
२) पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून उदगीर, लातूर येथे कार्यरत असताना गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा यशस्वीरीत्या तपास केल्यामुळे पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी रोख रक्कम ५० हजार रुपये व प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले आहे.
बालपण…
चंद्रकांत खांडवी यांचे बालपण अतिशय दुर्गम भागात गेले. डोंगर भागात गाव. एकत्र कुटुंब. एक भाऊ आणि तीन बहिणी. वडिलांचा शेती हा व्यवसाय. गावामध्ये वाहतुकीची व्यवस्था नव्हती. गावचा जंगली भाग असल्यामुळे तिन्ही ऋतू जोरदार असायचे. मुसळधार पाऊस पडायचा. पावसाळ्यात तर जगाशी संपर्कच नसायचा. एखादी व्यक्ती आजारी पडली तर डोली तयार करून त्यामधून मोठ्या गावामध्ये उपचारासाठी घेऊन जावे लागत असे. गावामध्ये वीज नसल्यामुळे दिव्यावर अभ्यास करून शिक्षण करावे लागले. गावामध्ये पहिली ते तिसरीपर्यंत शिक्षण झाले. पण, शाळेसाठी सुद्धा वर्ग नव्हते. गावामध्ये विविध ठिकाणी वर्ग भरायचे. थोडक्यात, डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचे बालपण गेले. बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी बालपणाचा आनंदही लुटला आहे.
आश्रमशाळा…
रोकडपाडा या गावामध्ये तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना शासकीय आश्रमशाळा सालभोये (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे राहून शिक्षण घ्यावे लागले. अगदी लहान वयातच आई-वडील आणि गावापासून दूर राहावे लागले. दिवाळी, उन्हाळा या सुट्टीमध्येच गावाला जाण्याची संधी मिळायची. वडील घ्यायला यायचे मग डोक्यावर पेटी घेऊन चालत गावाकडे निघायचे. ४ ते ७वी पर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये राहून पूर्ण झाले. दिंडोरी येथील आदिवासी वसतिगृह राहून ८ ते १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा बाहेरच झाले. यामुळे लहानपणी चौथीमध्ये असताना गाव सोडले ते आजपर्यंत. पण, गावची नाळ तुटलेली नाही. गावची ओढ आजही आहे. आई-वडील आणि गावापासून दूर राहिल्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त लागली. खेळाची आवड निर्माण झाली. शिक्षकांमुळे सुंदर अक्षर काढायला शिकलो. शिक्षणाचा आणि जीवनाचा पाया मजबूत झाला होता. खरं तर शिक्षकांमुळेच घडलो आहे, असे चंद्रकांत खांडवी सांगतात.
शिक्षक…
चंद्रकांत खांडवी यांनी २००० ते २००८ या काळात मातोश्री जशोदाबाई सोनी आश्रमशाळा निफाड, जि. नाशिक येथे आठ वर्षे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले. आठ वर्षांमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थीसुद्धा उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर काम करत असल्याचा त्यांना अभिमान आहे.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

