
युवतीसोबत दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न अन् लग्न मंडपात जोरदार राडा…
नाशिक : पहिल्या पत्नीसोबतचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात प्रलंबित असतानाच एकाने दुसऱ्या युवतीसोबत दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने थेट लग्न मंडपात धाव घेऊन जोरदार राडा घातला. या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तरुणाचं पहिलं लग्न झालं होतं. मागील काही काळापासून त्याचा पत्नीशी वाद सुरू होता. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागलेला नसताना आणि कायदेशीर घटस्फोट झालेला नसतानाही पतीने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसऱया युवतीसोबत दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
पतीच्या या दुसऱ्या लग्नाची कुणकुण लागताच पहिली पत्नी थेट लग्न मंडपात पोहचली. भर मंडपात तिने पतीला या बेकायदेशीर दुसऱ्या लग्नाबाबत विचारणा करत जाब विचारला. यामुळे लग्न सोहळ्यात एकच खळबळ उडाली आणि मोठा वाद निर्माण झाला.
दरम्यान, या घटनेनंतर पहिल्या पत्नीने पोलिसांत धाव घेऊन पतीविरोधात तक्रार नोंदवली. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगर! पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अन् दोघांना पकडले रंगेहाथ…
बुलढाणा! पतीकडून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या…
लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…
नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…
नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

