शेतकऱ्याला फायनान्सवाले घेऊन गेले अन् मृतदेहच हाती; कुटुंबाचा गंभीर आरोप…

नांदेड : नांदेडमध्ये अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चंद्रकांत शिंदे (वय 40, रा. माळकौठा) यांचा हा मृतदेह शहरातील के एफ एंटरप्रायझेस या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आला आहे. या घटनेनंतर चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घातपात करून त्यांना मारून त्यांच्या गळ्याला फास लावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत शिंदे यांच्याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी ‘KF एंटरप्रायजेस’ या खासगी फायनान्स कंपनीकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे कर्मचारी बुधवारी त्यांना गावातून थेट कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी त्यांचा मृतदेह याच फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मृत चंद्रकांत शिंदे यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. केवळ 10 हजारांच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्यांना कार्यालयात डांबून मारहाण केली आणि त्यानंतर बनाव रचण्यासाठी मृतदेह लटकल्याच्या अवस्थेत टांगला, असा खळबळजनक आरोप शिंदे परिवाराने केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या वसुली बंदीच्या आदेशानंतरही फायनान्स कंपन्यांची ही दडपशाही आणि छळवणूक कधी थांबणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. दुष्काळाच्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दारात कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांनी जाऊ नये, असा राज्य सरकारने सक्त आदेश दिला आहे. मात्र, या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या छळवणुकीच्या गंभीर घटना समोर येत आहेत.

शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…

‘खाकी’वर शोककळा! पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने उडवले अन्…

लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…

प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…

सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!