पुणे! युवतीसोबत कात्रज परिसरात घडला धक्कादायक प्रकार…

पुणे: पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुखसागरनगर परिसरात एका युवतीची भररस्त्यात छेडछाड करून तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

संबंधित धक्कादायक घटना शनिवारी (ता. २४) सायंकाळच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील समर्थ डेअरीसमोर घडली. एक युवती (वय १८) आपल्या मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. यादरम्यान आरोपीने तिची छेड काढत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याने नको तिथे स्पर्श करत पीडितेचं शर्ट पकडून तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या युवतीने तत्काळ आरडाओरड सुरू केली. तिचा आवाज ऐकून तिची मैत्रीण आणि आसपासच्या स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांनी युवतीची सुटका करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला रंगेहाथ पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला. नागरिकांनी पकडल्यानंतर संतापलेल्या आरोपीने वाद घालत एका नागरिकाचा मोबाईल जमिनीवर आदळून फोडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…

पुणे! युवक आणि युवती लॉजवर गेले अन् काही वेळातच…

पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!