
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील रमेश मोरे यांनी मांडली तर आरोपी तर्फे ॲड. के. जी. मुत्यालवार यांनी काम पाहिले.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेत एक अल्पवयीन मुलगी ५ व्या वर्गात शिकत होती. तसेच ती आदिवासी आश्रम शाळेतील वसतीगृहात राहत होती. आरोपी त्रेंबक आत्राम रा. जांब हा कामाठी म्हणून येथे कार्यरत होता. दिनांक ८ फेब्रुवारी २०१३ रोजी मध्यरात्री १२.३० ते १.३० चे दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी ही वसतीगृहात झोपली असतांना कामाठी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३) हा तिथे गेला व अल्पवयीन मुलीवर नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने घडलेली घटना आपल्या आई वडीलांना सांगितली. त्यानंतर पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर तक्रारीवरून आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम विरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९, ५११, ३७६, ४५१ व बाल लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश डाबरे यांनी करून पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले.
यात भादंवि कलम ३५४ व ५०९ अंतर्गत ७ वर्षाचा सश्रम कारावास, भादंवि कलम ३७६ व ५११ अंतर्गत ७ वर्ष सश्रम कारावास व ₹ ७००० द्रव्य दंड, दंड न भरल्यास आणखी ३ महिन्याची अतिरिक्त शिक्षा, भादंवि कलम ४५१ अंतर्गत १ वर्षाची शिक्षा व ₹ ३००० द्रव्य दंड, दंड न भरल्यास आणखी २ महिन्याची अतिरिक्त शिक्षा, भादंवि कलम ४१७ अंतर्गत ६ महीने सश्रम कारावास व ₹ १००० द्रव्य दंड, दंड न भरल्यास आणखी १ महिन्याची अतिरिक्त शिक्षा व बाल लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० अंतर्गत ७ वर्षाची शिक्षा व ₹ १०,००० द्रव्य दंड, दंड न भरल्यास आणखी ३ महिन्याची अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश मोरे (पांढरकवडा) यांनी सरकारची बाजू मांडली. या निकालामुळे पांढरकवडा व घाटंजी तालुक्यात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा; पाहा कायदे
अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…