
बुलढाणा! पतीकडून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या किनगाव राजा येथे एकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण किनगाव राजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संजीवनी दाभाडे असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर संजय दाभाडे असं अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय आणि संजीवनी यांच्यात वाद सुरू होता. पती संजय आपल्या पत्नीवर सातत्याने चारित्र्याचा संशय घेत होता. यातून दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. घटनेच्या दिवशी देखील पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचं रूपांतर हिंसक वळणात झाले आणि संतापलेल्या पतीने संजीवनी यांचा गळा आवळून खून केला.
View this post on Instagram
दरम्यान, हत्येची ही घटना उघडकीस येताच किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपी पती संजय दाभाडे याला तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी किनगाव राजा पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलिस करत आहेत.
लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…
महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…
धक्कादायक! इंजिनिअर नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव…
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

