पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…

पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे.

पुण्यात लाँड्रीचा मोठा व्यवसाय असणारा व्यावसायिक (वय ४६) १४ सप्टेंबर रोजी त्याच्या प्रेयसीसोबत गुपचूप मलेशियाला जाण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. त्याने आपल्या पत्नीला ही ट्रिप केवळ बिझनेससाठी असल्याचे सांगितले होते. विमानतळावर इमिग्रेशन चेकिंग सुरू असताना मैत्रिणीने सादर केलेला पासपोर्ट हा जुना होता. तिने आधीच ‘हरवला’ असल्याची पोलीस तक्रार नोंदवली होती. अधिकाऱ्यांनी तिला या पासपोर्टवर प्रवास करता येणार नाही असे स्पष्ट बजावले. मैत्रिणीवर कायदेशीर कारवाई होण्याची भीती आणि ती सोबत असल्याचे पत्नीला समजेल या भीतीने व्यापारी. अखेर त्याने स्वतःचाही प्रवास तातडीने रद्द केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

व्यापाऱ्याने तातडीने स्वतःचा मोबाईल फोन स्विच ऑफ केला. त्यानंतर तो त्याच्या मैत्रिणीसह दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर निघून गेला. तत्पूर्वी, त्याने विमानतळावरील एका लँडलाईन फोनवरून पत्नीला फोन केला आणि “इमिग्रेशनच्या समस्येमुळे मला माझा मोबाईल जमा करावा लागत आहे,” असा बनाव रचला. दुसऱ्या दिवशीही त्याने पत्नीशी अत्यंत त्रोटक असा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून पुन्हा एकदा इमिग्रेशनचीच खोटी कहाणी सांगितली. त्यानंतर त्याचा मोबाईल पूर्णपणे अनरिचेबल झाला.

पतीशी कोणताही संपर्क होत नसल्याने आणि तो परदेशात इमिग्रेशनच्या मोठ्या अडचणीत अडकल्याचे वाटल्याने पत्नी घाबरली. तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठून पतीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत एफआयआर नोंदवले. पत्नीने अपहरणाची एफआयआर नोंदवल्याची बातमी मिळताच घाबरलेला हा व्यावसायिक त्याच रात्री उशिरा मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पत्नीपासून प्रेयसीसोबतचा दौरा लपवण्यासाठी आपणच हा सगळा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली.

सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर आता न्यायालयात ‘सी समरी’ क्लोजर रिपोर्ट सादर केला जाणार आहे. जेव्हा एखादी केस निव्वळ गैरसमजातून किंवा चुकीच्या माहितीमुळे नोंदवली जाते, तेव्हा असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला जातो.

विवाहित प्रेयसीला घेऊन गेला एकांतात अन् प्रेयसी किंचाळच लागली धावू…

तोतया पीएमओ अधिकारी रोहन पारेखला करायचे होते प्रेयसीला ‘इंप्रेस’…

आयटी इंजिनिअर प्रेयसीला भेटायला पुण्यात आला अन् नको ते घडलं…

सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…

लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!