कल्याणमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 15 महिला अन्…

ठाणे: कल्याणमधील एका गेस्ट हाऊसमध्ये दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केलेल्या या कारवाईत 15 पीडित महिलांची सुटका केली असून, दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण स्थानक परिसरातील अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी झुंझाराव मार्केटमधील दुपारच्या सुमारास अचानक धाड टाकली. तेव्हा भंयकर रॅकेट समोर आले. या कारवाईत गेस्ट हाऊसच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांसह 15 महिलांवर कारवाई करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमधील मॅनेजर आणि एक वेटर महिलांना देहविक्री व्यवसायात अडकवत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून 15 महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरातच हे गेस्ट हाऊस असल्यामुळे कोणाला संशय नव्हता. मात्र, पोलिसांनी कारवाई करताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फोनवरून बुकिंग अन् लॉजवर मुली…

पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…

मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…

मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…

हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!