
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
रवींद्र बागूल हे पोलिस दलामध्ये गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. नाशिक शहर पोलिसमध्ये काम करत असताना विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक, २७३ रिवॉर्ड्स व ३० प्रशस्तिपत्रके मिळाली आहेत. भारतभर फिरून त्यांनी आरोपींना गजाआड केले आहे. नाशिक शहरातील अनेक गुन्हे उघड करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या विषयी थोडक्यात…
रवींद्र बागूल यांचे बालपण नाशिक शहरातील देवळाली कँम्पमध्ये गेले. शिक्षण आणि संपूर्ण नोकरीसुद्धा नाशिक शहरमध्येच झाली आहे. कुटुंबातील ते पहिले पोलिस अधिकारी. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर सुरुवातीला चार वर्षे खासगी नोकरी केली. मैदानी खेळाची आवड असल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. कुटुंबाला आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा आहे. कोणतेही व्यसन नाही. पोलिस दलात काम करत असताना आध्यात्मिक (सदगुरू श्री अनिरुद्ध (बापू) यांचे उपासक) क्षेत्राची जोड असल्यामुळे ताणतणाव येत नाही, असे रवींद्र बागूल सांगतात.
सायकलवरून प्रवास…
रवींद्र बागूल यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची आवश्यकता होती. एका ठिकाणी नोकरी मिळाली होती. पण, घरापासून ती तब्बल २२ किलोमीटर दूर होती. दररोज कामापर्यंत जायला जवळ पैसे नव्हते. सायकलवरून कामाला जाण्याचा निर्णय घेतला. दिवसभर काम शिवाय ४४ किलोमीटर सायकलिंग. पहिला पगार झाल्यानंतर जवळ पैसे आल्यानंतर बसने नोकरीच्या ठिकाणी जाऊ लागले. चार वर्षे खासगी नोकरी केली.
रवींद्र बागूल यांनी पोलिस दलात दाखल झाल्यानंतर विविध गुन्हे उघड केले आहेत. आरोपींच्या शोधासाठी ते देशभर तसेच तीन वेळा नेपाळला गेले आहेत. विविध ठिकाणांहून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय, नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण उघड करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताचा मोठा अनुभव आहे. स्थानिक पातळीवर काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. यामुळे गुन्हे उघड करताना मोठी मदत होते. संपूर्ण देशातील विविध भागांमधून आरोपी जेरबंद केले आहेत. त्यांनी घरफोडी, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, आर्म ऍक्टसह विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय, इराणी समुदायातील अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे, त्यापैकी काही निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…
मोबाईल तपासला अन् सापडला…
निफाड येथे घरफोडी झाली होती. एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये एक जाळतानाचा व्हिडिओ दिसला. अधिक तपास केल्यानंतर अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा खून करून मृतदेह नदीकिनारी जाळल्याची माहिती पुढे आली. पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी अस्थी नदीमध्ये फेकून दिल्या होत्या. मृत व्यक्तीच्या खुनानंतर पाच महिन्यांनी गुन्हा उघड झाला. घरफोडीच्या तपासासाठी ताब्यात घेतले आणि खुनाचा गुन्हा उघड झाला तो केवळ मोबाईलमधील व्हिडिओमुळे. पुढे आरोपीला शिक्षा झाली.
२०१८ मध्ये नाशिक शहरामधील ड्रग्ज प्रकरण उघड केले. तपासाचा शेवट गुजरातमध्ये झाला. आरोपींना अटक, तर करण्यात आलीच पण तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दुसऱ्या एका घटनेत घरफोडीचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. इराणी आरोपीला अटक करून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढे आरोपीला शिक्षा झाली. संबंधित गुन्हे उघड करण्यात रवींद्र बागूल यांचा मोलाचा वाटा होता.
वृद्ध महिलेच्या खुनाला फुटली वाचा…
उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत एका वृद्ध महिलेची हत्या झाली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने शिवाय घरातील रक्कम चोरून नेण्यात आली होती. पण, पाठीमागे कोणताही सुगावा नव्हता. आरोपीचा शोध सुरू होता.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

