
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
सत्यवान गोविंद पवार हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडिलांचा मुंबईत व्यवसाय. वडिलांसोबत सुट्टीमध्ये लहानपणी मुंबईत गेले आणि पोलिस अधिकारी पाहून आकर्षित झाले. शालेय जीवनात असतानाच पोलिस अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न साकार केले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर विविध गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांच्याविषयी थोडक्यात…
सत्यवान पवार यांचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी हे गाव. शेतकरी कुटुंबातील जन्म. वडिलांचा मुंबईत व्यवसाय. व्यवसाय आणि शेती यामध्ये जम बसल्यामुळे कुटुंबातील नोकरीकडे कोणी वळाले नाही. सत्यवान हे वडिलांसोबत सुट्टीमध्ये मुंबईत जायचे. वडिलांचा व्यवसाय पाहत असतानाच पोलिस अधिकारी जवळून पाहता आले. पोलिस अधिकाऱ्याचा रुबाब पाहून त्यांनी शाळेत असतानाच पोलिस अधिकारी होण्याचे निश्चित केले. पण, पोलिस अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याबाबत काहीच माहिती नव्हती. एका पोलिस अधिकाऱ्याकडून माहिती घेतली आणि पुढे पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली. कुटुंबामधील ते पहिलेच पोलिस अधिकारी ठरले आहेत.
शेती अन् व्यवसाय…
पवार कुटुंबीयामध्ये नोकरीला कोणी नसल्यामुळे शेती आणि व्यवसायावरच प्रामुख्याने भर होता. शेती बागायती. मुंबईत वडिलांचा व्यवसाय. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेती सांभाळून व्यवसाय सांभाळायचा हे ठरलेले होते. शिक्षण सुरू असतानाही शेतीकडे लक्ष होते. शेती पाहून अभ्यास करत होते. दुसरीकडे अभ्यासामध्येही ते लहानपणापासून हुशार होते.
मुंबई अन् जीवनाला कलाटणी…
मुंबईला वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे सुट्टीत मुंबईला जात. एकदा सुट्टीत मुंबईत गेल्यानंतर पोलिस अधिकारी जवळून पाहायला मिळाले आणि पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि जीवनाला कलाटणी मिळाली. एका पोलिस अधिकाऱ्याकडून माहिती घेतली आणि २००६मध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षेत उत्तीर्णही झाले. पण, शारिरीक परीक्षेत एका गुणावरून अपयशाला सामोरे जावे लागले. दुर्दैवाने, २००७मध्ये वडिलांचे निधन झाले.
आईचा मोलाचा सल्ला…
वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. शेती आणि व्यवसाय दोन्ही महत्त्वाचे होते. पण, त्या वेळी आवडीचे क्षेत्र निवड, असा मोलाचा सल्ला आईने दिला आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. ग्रुपने अभ्यास सुरू केला आणि स्पर्धा परीक्षा दिली. निकाल हाती आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती. आई-वडिलांचे स्वप्न साकार केले होते आणि कुटुंबातील, गावातील ते पहिले पोलिस अधिकारी ठरले. शिक्षण घेत असताना पोलिस म्हटले की भीती वाटत होती. पण, जिद्दीमधून पोलिस अधिकारी होऊन दाखवले आहे.
सत्यवान पवार यांना पोलिस दलात दाखल झाल्यानंतर मुंबईमध्ये खूप काही शिकायला मिळाले. अनेक किचकट गुन्हे उघड केले. आरोपींना जेरबंद केले आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला. पोलिस दलात दाखल झाल्यापासून गुन्हे उघड करण्याची आवड निर्माण झाली. पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस स्टेशनला आलेल्या प्रत्येकाला चहा-पाणी देत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा झाला आहे. जनसंपर्कामधून गुन्हे उघड करण्यास मदत होत आहे. त्यांनी निवडक उघड केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे…
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

