
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
डॉ. धर्मराज बांगर हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी विविध कारवाया केल्या आहेत. पण, पोलिस दलात सहभागी होण्यापूर्वी ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पासही झाले. डॉक्टर झालेले असतानाही वेगळी वाट निवडली आणि पोलिस अधिकारी झाले. डॉक्टर आणि पोलिस खाते हे दोन्ही वेगवेगळे विभाग असले तरी पोलिस दलात काम करताना एक वेगळा आनंद मिळत आहे, असे डॉ. धर्मराज बांगर सांगतात. त्यांच्याविषयी थोडक्यात…
डॉ. धर्मराज बांगर यांचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील करी हे गाव. शेतकरी, आध्यात्मिक कुटुंबातील जन्म. वडील रेल्वेमध्ये नोकरीला, तर आई गृहिणी. करी हे वडिलांचे गाव, पण बालपण आणि शिक्षण सत्यगाव (पो. मुखेड, ता. येवला, जि. नाशिक) या मामाच्या गावाला झाले. बालपणातील जडणघडण मामाच्याच गावाला झाली. फक्त सुट्टीमध्ये आई-वडिलांकडे यायला मिळायचे. अकरावी आणि बारावीचे शिक्षण मावशीकडे झाले आणि तिथेच आयुष्याला कलाटणी मिळाली. मावशी-काकांमुळे डॉक्टर झालो तर वेगळे काही करायचे म्हणून स्पर्धा परीक्षा दिली आणि पोलिस अधिकारी झाल्याचे डॉ. धर्मराज बांगर सांगतात.
मामाचे गाव…
डॉ. धर्मराज बांगर यांचे वडील रेल्वेत नोकरी करत होते. पण, कुटुंबावर काही प्रसंग ओढावल्यानंतर आजोबा (मामाचे वडील) लहानपणीच त्यांच्या गावी घेऊन गेले. यामुळे करी हे वडिलांचे गाव असले, तरी ते सत्यगाव येथील पांडुरंग लहानू दराडे या मामाच्या गावीच ते लहानाचे मोठे झाले. मामाच्या गावामध्ये राहून पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंब असलेले मामाचे घर म्हणजे माळकरी आणि आध्यात्मिक. धार्मिक संप्रदायामुळे मामाच्या घरामध्ये चांगले संस्कार मिळाले. आयुष्याची जडणघडण आजी-आजोबा आणि मामांकडे झाल्यामुळे पुढे फायदा होत आहे.
मावशी-काकांमुळे डॉक्टर…
दहावीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावाला झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी नाशिक येथील आशा या मावशी आणि चंद्रकांत मुरलीधर आव्हाड या काकाकडे राहून पूर्ण करण्याचे ठरले. मावशी-काकाचे कुटुंब म्हणजे शिस्तबद्ध. अकरावी-बारावीमध्ये शिक्षण घेत असताना कडक शिस्तीमुळे अभ्यास आणि क्लासपलीकडे वेळ वाया जात नव्हता. यामुळे बारावीला चांगले गुण मिळाले. खरंतर याचे सर्व श्रेय मावशी-काकालाच जाते, असे डॉ. धर्मराज बांगर सांगतात. बारावीनंतर नीटची परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळाले. पुढे बीएएमएस केले आणि २००८मध्ये डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर आई-वडील, मामा, मावशी-काका या सर्वच नातेवाइकांना मोठा आनंद झाला होता. कारण, यामध्ये सर्वांचाच मोठा वाटा होता, असेही डॉ. धर्मराज सांगतात.
डॉक्टर म्हणून नोकरी…
डॉक्टर झाल्यानंतर मुंबईमध्ये एका रुग्णालयात नोकरी सुरू केली. रुग्णालयात रात्रपाळी असायची. सूरज धिरबसी हा मित्र सोबत असायचा. मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. लालबाग येथे एका लायब्ररीचे उद्घाटन होते. लायब्ररीच्या उद्घाटनादरम्यान पोलिस अधिकाऱ्याचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्याचे व्याख्यान ऐकले आणि मन परिवर्तन झाले. आपणही पोलिस अधिकारी झालो तर असा विचार मनात येऊन गेला. पुढे एका वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्धार केला.
एक लाख रुपये…
रुग्णालयात नोकरी करत असताना एक लाख रुपये साठवले होते. कुटुंबीयांकडून पैसे घ्यायचे नव्हते. मित्र सूरज आणि धर्मराज यांनी नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई सोडून पुणे गाठले. पुणे शहरात मित्राकडे राहण्याची व्यवस्था झाली. जिद्दीने अभ्यास सुरू केला. मोबाईल दूर ठेवला आणि लायब्ररीमध्ये दिवसातील १४-१५ तास अभ्यास सुरू करू लागले. एक लाख रुपये संपेपर्यंतच हातामध्ये वेळ होता. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, हे घरच्यांना माहीतही नव्हते. स्पर्धा परीक्षेला घरच्यांचा विरोध नव्हता. पण, वेगळी वाट निवडायची म्हणून स्वतः निर्णय घेतला होता.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

