सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
हेमंत तोडकर यांच्या कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा. चौथी पिढी पोलिस दलात कार्यरत आहे. हेमंत तोडकर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. पण, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पोलिस अधिकारी झाल्याशिवाय लग्न न करण्याचा पण केला. पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस अधिकारी मोठा प्रवास. पण, अधिकारी होऊनच दाखवले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर विविध गुन्हे उघड केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हे उघड करण्यात हातखंडा असलेला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्याविषयी थोडक्यात…

हेमंत तोडकर यांचे बालपण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे गेले. त्यांची चौथी पिढी पोलिस दलात कार्यरत असून, सध्या एक जण सेवेत आहे. कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा असल्यामुळे पोलिसांच्या कामाची पद्धत लहानपणापासूनच माहीत आहे. हेमंत तोडकर यांनी पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नऊ वर्षे नोकरी केली. पण, अधिकारी होण्याचे स्वप्न होते. प्रयत्न केल्यानंतरही एक-दोन गुणांवरून हुलकावणी मिळत होती. जिद्दीने अभ्यास आणि प्रयत्न सुरू ठेवले आणि पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी झाल्यानंतर मोठ-मोठे गुन्हे उघड केले आहेत. याबद्दल त्यांना २६० रिवॉर्ड्स आणि ४८ प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. या आकड्यांवरूनच त्यांचे काम पाहायला मिळते.

अधिकारी होईपर्यंत लग्न नाही…
पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू होताना ७० जणांची बॅच होती. पुढे त्यामधील एक सहकारी पोलिस उपनिरीक्षक झाला. पोलिस अधिकारी झाल्याशिवाय आपणही लग्न करायचे नाही, असा हेमंत तोडकर यांनी पण केला. नोकरी करत असतानाच अभ्यास सुरू होताच. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी अभ्यास करण्यासाठी लायब्ररी जोडून दिली होती. हेमंत यांनी पोलिस अधिकारी होण्यासाठी अनेक सहकाऱ्यांना तयार केले. आग्रहाखातर मित्र अभ्यास करू लागले आणि परीक्षा देऊ लागले. निकाल हाती आल्यानंतर मित्र परिक्षा पास होऊ लागले. पण, हेमंत यांना एकदा एक आणि दुसऱ्यांदा पाच गुणांवरून अपयशाला सामोरे जावे लागले. पण, जिद्द सोडली नव्हती. काही झाले तरी अधिकारी व्हायचेच, हे ठरवले होते.

साईबाबांचे दर्शन घेतले अन्…
सहकारी पोलिस अधिकारी झाले होते. आपणही पोलिस अधिकारी होऊ असा विश्वास होता. २०११ मध्ये शेवटच्या क्षणी फॉर्म भरला. हेमंत हे साईबाबांचे भक्त. साईबाबांचे सेवाभावे दर्शन घेतले. सर्व मित्र पोलिस अधिकारी झाले आहेत, शेवटी मीच राहिलो आहे, असे दर्शन घेताना मनोमन म्हटले. अभ्यास आणि मैदानी प्रॅक्टिस तर सुरूच होती. मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले. निकाल हाती आला आणि पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. कुटुंबीयांसह त्यांना मोठा आनंद झाला होता. कारण, पोलिस कॉन्स्टेबलवरून पोलिस उपनिरीक्षक झाले होते. एक मोठे स्वप्न साकार झाले होते.

पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर विविध आणि मोठमोठे गुन्हे उघड केले आहेत. सायबर क्राइमधील गुन्हे उघड करण्यात त्यांचा हातखंडा आहे. औरंगाबाद येथे असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सायबर क्राइमबद्दल खूप काही शिकायला मिळाल्याचे श्री. तोडकर सांगतात. देशातील विविध भागांमध्ये जाऊन त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय, मोठमोठ्या रकमा जप्त केल्या आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विश्वास टाकल्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गु्न्हे उघड केले आहेत. विविध गुन्हे उघड केल्यामुळेच २६० रिवॉर्ड्स आणि ४८ प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. हेमंत तोडकर यांनी उघड केलेले निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…

५२ लाख रुपयांचा दरोडा…
एमआयडीसी सिडको येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती होती. एका शाळेची ५२ लाख रुपयांची रक्कम बॅंकेत भरण्यासाठी मोटारीमधून पाठवली जात होती. पण, चालकाने आपल्याला मारहाण करून रक्कम लुटून नेल्याची तक्रार केली. हेमंत तोडकर यांचा पोलिस उपनिरीक्षक म्हणून पहिलाच तपास होता.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!