पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
पुणेः पोलिस अधिकारी (DYSP) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या जेनिफर ऍण्ड दि बीस्ट या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) होणार आहे.
सातारा येथेल दीपलक्ष्मी नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, अभिनेत्री व लेखिका मृणाल देव-कुलकर्णी, शिरीष चिटणीस, डॉ. अमर अडके, सुप्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, कवी उध्दव कानडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सातारा येथील के.बी.पी. इंजिनिअरींग कॉलेज सभागृहात सोमवारी (ता. २०) सायंकाळी चार ते सात या वेळेत पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
दरम्यान, पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पु्स्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कॉन्टीनेंटल प्रकाशीत ‘युआर अंडर अॅरेस्ट या पुस्तकास प्रेरणा फाऊन्डेशनचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय, विविध वृत्तपत्रे, वेबसाईट, नियतकालिकमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सायबर क्राईम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. विविध गुन्हे त्यांनी उघड केले असून त्यांना पोलिस खात्याची १२५ हून अधिक बक्षीसे ५० हून अधिक प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत.
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!