
आजम शेख : पोलिस अधिकारी घडवायचेत!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
आजम शेख यांचा लातूर जिल्ह्यातील गाधवड या गावामधील शेतकरी कुटुंबातील जन्म. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एमबीए अशी पदवी घेतल्यानंतर कोणताही क्लास न लावता यूपीएससी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नाच उत्तीर्ण झाले. खाकी वर्दीची पहिल्यापासून आवड. आयपीएस अधिकारी व्हायचे की व्यवसायाच्या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा करायची? हा प्रश्न एकाच वेळी समोर आला. काही काळ विचार केल्यानंतर व्यवसाय हे उत्तर निवडले. व्यवसायात काही वर्षातच गरूडझेप घेत हजारो युवकांना रोजगार तर मिळवून दिलाच. पण, खाकी वर्दीचे स्वप्न बाजूला ठेवले असले तरी पोलिसांसाठी मोठे काम करत आहेत. समाजसेवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन्ही पातळ्यांवर काम करत असताना देशसेवा करत असल्याची कुठेतरी समाधानाची भावना आहे. आजम शेख यांच्या यशस्वी कारकिर्दीविषयी थोडक्यात…
आजम शेख यांचा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म. त्यांना दोन बहिणी. लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार घेऊन वाढले. मामाच्या गावाला (आजोळी) राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पदवी, एमबीए, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा बालमित्र, आत्तेभाऊ आणि गुरू असलेले अली मर्चेंट यांनी आजम यांच्यामधील टॅलेंट ओळखले होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयपीएस अधिकारी न होता व्यवसायात सहभागी होण्याचा सल्ला दिला. ऐन तारुण्यात दोघांनी कंपनी उच्च स्तरावर नेवून ठेवली आहे. एएम इन्फोवेब कंपनीमध्ये आज रोजी दोन हजार युवक-युवती कार्यरत आहेत.
शिक्षण…
१ ते ७ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव, ता. केज, जि. बीड
८ ते १२ – जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबेजोगाई, जि. बीड
कॉम्प्युटर इंजिनिअर पदवी – लातूर
एमबीए – पुणे
नोकरी…
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयबीएम आणि टाटा कंपनीमध्ये अडीच वर्षे नोकरी.
अली मर्चेंट…
अली मर्चेंट हे आजम शेख यांचे नात्याने आत्तेभाऊ (मूळचे रा. भावनगर, गुजरात). मोठा भाऊ, मित्र, मेन्टोर, गुरू आहेत. पण, नात्यापेक्षा दोघांमध्ये फुलली ती अधिक मैत्री. अली मर्चेंट यांच्याविषयी सांगायचे म्हटले तर मित्र, भाऊ यापेक्षा सर्वांत मोठे म्हणजे गुरू आहेत, असे आजम शेख सांगतात. अली मर्चेंट आणि आजम शेख हे ए एम इन्फोवेब कंपनीचे संचालक आहेत. अली मर्चेंट यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली. पण, घरामधून एक रुपयाही न घेता ऐन तारुण्यात घराबाहेर पडले. गुजरातमध्ये जाऊन व्यवसायाच्या माध्यमातून मोठी भरारी घेतली. ऐन विशीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे, हॉटेलचे मालक बनले. परंतु, चुकीच्या माध्यमातून पैसा मिळवत असल्याचे वडिलांनी निदर्शनास आणून दिले. कमावलेले सर्व दान करून सरळ मार्गाने काम करण्याचे ठरवले. व्यवसायाच्या माध्यमातून उभारलेली संपूर्ण रक्कम सामाजिक संस्थाना दान केली आणि मोकळ्या हाताने माघारी आले.
ए एम इन्फोवेब कंपनीची उभारणी…
स्वतःचे काही पैसे जवळ राहिले नव्हते. पुढे काय? हा प्रश्न तर होताच. काही झाले तरी स्वबळावर उभे राहण्याचा निर्धार केला. २०११ मध्ये पुणे शहर गाठले. एका फ्लॅटमध्ये राहून संगणकाच्या माध्यमातून आयटी व्यवसायाला सुरवात केली. अमेरिकनस्थित काम असलेल्या कंपनीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. अमेरिकेतील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे काम कंपनी करत आहे. कंपनीच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे जीव वाचविण्याचे काम कंपनी करत असल्यामुळे मोठे समाधान मिळत असल्याचे आजम शेख सांगतात.
खाकीचे आकर्षण अन् स्पर्धा परीक्षा…
आजम शेख यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक चित्रपट त्यांच्या पाहण्यात आला होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका होती. खाकी वर्दी, बुलेट आणि अभिनेत्याचा रुबाब पाहून आपणही पोलिस अधिकारी व्हावे का? असा विचार आजम शेख यांच्या मनात आला. कारण, खाकी वर्दीची तर पहिल्यापासून आवड तर होतीच. पोलिस अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते? याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली. एका उच्च आयपीएस अधिकाऱ्याकडून प्रेरणा घेतली. कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करत पोलिस कॉन्स्टेबल, पीएसआय आणि यूपीएससी २०१४-१५ मध्ये परीक्षा दिली. विशेष म्हणजे तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले. आयपीएसची पुढे प्री आणि मेन्स या दोन्ही परीक्षाही उत्तीर्ण झाले. आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करायची हे ठरले. खाकी वर्दी अंगावर चढण्याचे स्वप्न पडू लागले. कारण, आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते. फक्त मुलाखत बाकी होती.
पोलिस अधिकारी की व्यवयाय?
आजम शेख हे आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा आनंद झाला होता. अभिनंदनचा वर्षाव सुरू होता. दुसरीकडे अली मर्चेंट यांची ए एम इन्फोवेब कंपनी वाढत होती. अली मर्चेंट यांनी आजम शेख यांचे अभिनंदन केले आणि त्याचबरोबर काही प्रश्नही विचारले. आजम शेख यांनी आयपीएस होऊन महाराष्ट्रातच राहायचे होते. पण, महाराष्ट्र कॅडरर नाही मिळाले तर? असा प्रश्न अली मर्चेंट यांनी विचारला. आज तू आयपीएस अधिकारी होशील. पण, पोलिस अधिकारी होण्यापेक्षा माझ्या कंपनीला तुझी जास्त गरज असल्याचे अली मर्चेंट यांनी सांगितले. दुहेरी संकट. आयपीएस अधिकारी होणे सोपे नाही. पण, भाऊ, मित्र, गुरू असलेले अली मर्चेंट तर नोकरी करू नको म्हणून सांगत आहेत. काय करावे कळेनासे झाले होते. पण, एक मात्र होते अली मर्चेंट यांनी दूरदृष्टी होती. खूप विचार केला आणि नोकरीकडे न जाता व्यवसायात जाण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला.
एएम इन्फोवेब कंपनीचा वाढता आलेख…
अली मर्चेंट यांच्या सल्ल्यानुसार आजम शेख यांनी कंपनीमध्ये पदार्पण केले. २०११ ते २०२३ या वर्षांत कंपनीने उच्च भरारी घेतली आहे. अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. कंपनीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. कंपनीच्या माध्यमातून मोठमोठी कामे केली जात आहेत. विद्यार्थी, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमांना मदतीचा हात पुढे केला जात आहे. दुसरीकडे पोलिसांसाठी सुद्धा वेगवेगळी कामे केली जात आहेत.
पोलिस खात्याशी ऋणानुबंध…
आजम शेख हे आयपीएस अधिकारी होऊन कार्यरत असते. पण, व्यवसायात प्रवेश केल्यानंतरही खाकीवरील त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. अनेक पोलिस अधिकारी त्यांचे मित्र आहेत. पोलिसांना मदतीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ ४ मधील पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या पोलिस स्टेशनला कोणतीही मदत लागली तरी ते निःसंकोचपणे करत असतात. एक सामाजिक जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. फक्त खाकीवरील निःस्वार्थी प्रेमापोटी हे करत आहेत. पोलिस स्टेशनमधून मदतीसाठी एखादा फोन आला तरी काही वेळात मदत पोहचलेली असते. पण, दुसरीकडे कोणतेही वैयक्तीक काम घेऊन आजपर्यंत पोलिसांकडे गेलो नाही, असे आजम शेख सांगतात. थोडक्यात, आजम शेख हे पोलिस अधिकारी झाले नसले तरी पोलिस खात्याशी त्यांचा ऋणानुबंध कायम आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…