
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
शेखर देशमुख हे गेल्या दहा वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर केंद्रीय सचिवालयात अडीच वर्षे काम केले. नायब तहसलीदार म्हणून सुद्धा अडीच वर्षे काम केले. पण, पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. नोकरीत असतानाच जिद्दीने अभ्यास केला आणि राज्यात DYSP परीक्षेत प्रथम आले आणि पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांच्याविषयी थोडक्यात…
शेखर देशमुख यांचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे गाव. मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म. आई शिक्षिका तर वडील नोकरीत. आई शिक्षिका असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्याचा निश्चय केला. पण, दोन वेळा केवळ एक-एक गुणांवरून क्लास वन होण्याचे स्वप्न हुकले. क्लास टू अधिकारी म्हणून सरकारी नोकरी मिळाली. पण, पोलिस दलातील क्लास वन अधिकारी होण्याची जिद्द होती. एक स्वप्न साकार करायचे होते. नोकरी करत असतानाच अभ्यास सुरू ठेवला आणि राज्यात DYSP परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आणि स्वप्न साकार झाले.
शिक्षण…
१ ते १०वी – जि. प. शाळा ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
११ ते १२वी – अहमदनगर
BCS – न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर
पोलिस दलातील कार्यकाल…
२०१४ ते २०१५ – प्रशिक्षण
२०१५ ते २०१६ – अमरावती
२०२६ ते २०१९ – एसडीपीओ, राजूर, चंद्रपूर
२०१९ ते २०२१ – चंद्रपूर मुख्यालय
२०२१ ते २०२३ – आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
२०२३ ते २०२४ – सहाय्यक पोलिस आयुक्त, नाशिक
कुटुंबाविषयी…
आईचे वडील (आजोबा) शिक्षक होते. आईसुद्धा शिक्षिका झाली तर वडील नोकरीत होते. तिघे भाऊ. उच्च शिक्षित कुटुंब. आई शिक्षिका असल्यामुळे विविध भागांमध्ये शिक्षण झाले. शिवाय, खूप काही शिकायला मिळाले. घरी शैक्षणिक वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली होती. शिवाय, लहानपणापासून पेपर वाचनाची सवय असल्यामुळे स्पर्धा परीक्षा देताना त्याचा मोठा फायदा झाला.
होस्टेल लाइफ अन् स्पर्धा परीक्षा…
दहावीला चांगले गुण मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अहमदनगर गाठले. होस्टेलमध्ये राहून अकरावी व बारावी पूर्ण केले. होस्टेल लाइफमध्ये खूप काही शिकायला मिळते असे ऐकले होते. पण, होस्टेलमध्ये राहत असताना त्यांना खरोखरच खूप काही शिकायला मिळाले. आयुष्याची जडणघडण तेथे झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मित्रांमुळे स्पर्धा परीक्षा समजली. बीसीएस करत असताना स्पर्धा परीक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्याचा निश्चय केला.
ग्रुपने अभ्यास…
बीसीएस पूर्ण झाल्यानंतर एक वर्षे घरीच अभ्यास केला आणि पुणे गाठले. पुणे शहरात गेल्यानंतर सहा जणांचा ग्रुप तयार झाला आणि ग्रुपने अभ्यास सुरू केला. २००३मध्ये सर्वांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व जण उत्तीर्ण झाले. शेखर देशमुख यांचे एका गुणावरून क्लास वन अधिकारी पद हुकले होते. परंतु, सरकारी नोकरी मिळाली होती. नांदेड येथे अपर कोशागर अधिकारी म्हणून अडीच वर्षे काम केले. परंतु, क्लास वन अधिकारी व्हायचे असल्यामुळे कामात लक्ष लागत नव्हते. अखेर, नोकरीचा राजीनामा दिला.
राज्यात डीवायएसपी म्हणून प्रथम…
सरकारी नोकरी करत असतानाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच होता. पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा दिली आणि केंद्रीय सचिवलायात निवड झाली. संपूर्ण भारतात ते तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पुन्हा परीक्षा दिल्यानंतर परत एका गुणाने क्लास वन अधिकारी पद हुकले. पुन्हा क्लास टू अधिकारी म्हणून नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे अडीच वर्षे नायब तहसीलदार म्हणून नोकरी केली. नोकरीत असतानाच क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आणि राज्यात डीवायएसपी म्हणून प्रथम आले आणि पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले. शिवाय, कुटुंबातील पहिले पोलिस अधिकारी होण्याचा त्यांनी मान मिळविला.
शेखर देशमुख यांना अभ्यासाचे महत्त्व माहीत होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर पुढे जाता येते, हे अनुभवले होते. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय तर दिलाच. शिवाय, विविध सामाजिक कामे करताना विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी लायब्ररी सुरू केली आहे. त्यांनी केलेली निवडक कामे पुढीलप्रमाणे…
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

