
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सहभागी होण्यासाठी तब्बल पाच वेळा प्रयत्न केले पण यश काही मिळत नव्हते. पोलिस दलात जाण्याची जिद्द तर होतीच. पण, सतत येणाऱ्या अपयशामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळावे लागले. एक-दोन नव्हे तर ८० म्हशी विकत घेतल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. दररोजचे २५० लिटर दूध. प्रचंड मेहनत. पण, एक प्रसंगी त्यांना हिणवले गेले आणि काही करून पोलिस दलात जाण्याचा निर्णय घेतला. फक्त एक महिना अभ्यास केला आणि पोलिस कॉन्स्टेबल नव्हे तर जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक होऊन दाखवले. पोलिस दलातही दाखल झाल्यानंतर गेल्या १२ वर्षांत अनेक गुन्हे उघड केले आहे. गुन्हे उघड करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ज्ञानेश्वर मोहिते यांच्या जिद्दी आणि प्रेरणादायी कारकिर्दीविषयी थोडक्यात…
ज्ञानेश्वर मोहिते यांचे बालपण मामाकडे गेले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाणा या गावी ते लहानाचे मोठे झाले. दहावीमध्ये ४८ टक्के गुणांनी पास झाले, पण बारावीमध्ये जिद्दीच्या जोरावर ८३ टक्के गुण मिळविले. लष्कर आणि पोलिस दलातील खाकीचे लहानपणापासून आकर्षण. पोलिस दलात जाण्याचा निश्चय केला. पोलिस भरतीदरम्यान पाच वेळा अपयश आल्यानंतर ते पोलिस अधिकारी झाले. याचे श्रेय ते मामाला देतात. पोलिस दलात येण्याचे स्वप्न त्यांचे पूर्ण झाले. पोलिस दलात गेल्या १२ वर्षांपासून काम करत असताना त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.
खाकीचे आकर्षण…
लहानपणापासून खाकीचे आकर्षण होते. ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांचा चुलत भाऊ नवनाथ मोहिते यांनी भरतीसाठी तयारी सुरू केली. चुलत भाऊ लष्करात भरती झाला. ज्ञानेश्वर पोलिस भरतीची तयारी करू लागले. पण, यश येत नव्हते. एक-दोन नव्हे तर पाच वेळा पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले. पण, पाचही वेळा पदरी निराशाच पडली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण पाच-पाच वेळा अपयश. हे कुठे तरी त्यांच्या मनाला खटकत राहिले.
म्हशींचा दुधाचा व्यवसाय…
पोलिस दलात भरती होण्यासाठी पाच वेळा प्रयत्न करूनही अपयश आले होते. दुसरीकडे वय वाढत चालले होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काही तरी करणे गरजेचे होते. नोकरीचे अवघड होते. त्यामुळे शेती व्यवसायात राहून दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसाय करायचा तर मोठाच करायचा, हेसुद्धा त्यांनी ठरवले. म्हशी खरेदी करण्यासाठी सुरुवात केली. गोठा तयार केला. म्हशींच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली. एक एक अशा पद्धतीने गोठ्यात तब्बल ८० म्हशी आल्या. म्हशी आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे प्रचंड मेहतीचे काम. संपूर्ण दिवस म्हशींची निगा राखणे आणि दूध डेअरीला नेण्यामध्ये जाऊ लागला. २५० लिटर दूध डेअरीला जाऊ लागले. व्यवसायामध्ये चांगला जम बसला होता. यापुढे म्हशी आणि दुग्ध व्यवसाय हे ठरले होते. दरम्यानच्या काळात विवाह झाला. पती-पत्नी दुग्ध व्यवसायात रमून गेले होते. पंचक्रोशीत काही दिवसांतच त्यांनी प्रगतशील दुग्ध व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली.
आजोबांचे निधन अन् नको तो शब्द…
दुग्ध व्यवसायामुळे चांगले पैसे मिळत होते. दरम्यानच्या काळात आजोबांचे निधन झाले. आजोबांच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक जमा झाले होते. आजोबांवर अंत्यसंस्कारही झाले. घरामध्ये दुःखद असे वातावरण होते. आजोबांच्या निधनाच्या दिवशीच एका नातेवाइकाने पोलिस भरतीचे काय झाले? म्हणून विषय काढला. पोलिसमध्ये भरती होणार नसल्याचा टोमणाही मारला. नातेवाइकाचा तो शब्द ज्ञानेश्वर यांच्या थेट काळजात घुसला. वाईट वाटले अन् त्याच क्षणी ठरवले. पुन्हा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करायचे. लहान भाऊ विष्णूकडे म्हशींची जबाबदारी सोपवली आणि आजोबांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी थेट पुणे गाठले.
वडिलांचे निधन आणि मामाचे मार्गदर्शन…
ज्ञानेश्वर मोहिते यांच्या वडिलांचे बारावीमध्ये असताना निधन झाले. रोहिदास पवार या मामांमुळे त्यांना लहानपणापासून शिस्त लागली होती. थोडक्यात, त्यांच्यामुळे जडणघडण होत होती. मामा शिक्षक होते. पण, शिक्षक म्हणून नोकरी करत असताना ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. पुढे मामांनी सु्द्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारीपदापर्यंत मजल मारली. मामांच्या मार्गदर्शनाखाली घडत राहिले. मामांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ज्ञानेश्वर यांना दोन वर्षांचा कालावधी दिला होता. दोन वर्षांत अभ्यास करून अधिकारी झाला, तर ठीक अन्यथा म्हशी होत्याच.
जिद्दीने अभ्यास…
नातेवाईकांचे शब्द जिव्हारी लागले होते. पुणे शहरात दाखल झाल्यानंतर जिद्दीने अभ्यास सुरू केला. रात्रंदिवस फक्त अभ्यास आणि अभ्यास. मामाने मोबाईल काढून घेतला होता. फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. पोलिस भरतीमध्ये पाच वेळा अपयश आल्याचा विचार आला, की अधिकारी होण्याचे स्वप्न पुढे दिसे. आता पोलिस कॉन्स्टेबल नव्हे तर पोलिस अधिकारी होणार हे ठरवले होते. एक महिनाभर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि २०१०मध्ये मोठ्या जिद्दीने परीक्षेला सामोरे गेले.
निकाल हाती आला अन् डोळ्यांत अश्रू तरळले…
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

