
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
नितीन धोंडगे हे गेल्या २४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील श्रावण धोंडगे हे पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. कुटुंबाचा पोलिस दलाचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला असून, पोलिस पाल्य म्हणून वयाच्या १८व्या वर्षी भरती झाले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. पोलिस मोटार परिवहन विभागासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शिवाय, सहकाऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या विषयी थोडक्यात…
नितीन धोंडगे यांचे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बहीराणे हे गाव. वडील पोलिस दलातून सेवानिवृत्त. उच्चशिक्षित कुटुंब. तिघे भाऊ. एक पोलिस दलात, दुसरा शिक्षक आणि तिसरा न्यायाधीश. नितीन धोंडगे यांना वडिलांमुळे पोलिस दलाची आवड निर्माण झाली आणि २००१ साली वयाच्या १८व्या वर्षीच एसआरपीएफमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. पोलिस दलातील खात्यांतर्गत परीक्षेत यश मिळवत त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. वाहन चालविण्याची आवड असल्यामुळे पोलिस मोटार परिवहन विभाग आले आणि मोठमोठे बदल घडवून आणले. धुळे पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी कौतुक केले. शिवाय, पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ९२ रिवॉर्ड्स आणि A+ पुरस्कार मिळाला आहे. सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेक कामे केली आहेत.
पोलिस मोटार परिवहन विभाग नाशिक घटकाकरिता पोलिस महासंचालक कार्यालयाकडून 30 लाख रुपये निधी मंजूर करून घेऊन आधुनिक टूल्स आणि इक्युपमेंन्ट खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन दुरुस्ती करताना तांत्रिक अंमलदार यांना त्यांचे काम सोपे झाले असून कामात सुसूत्रता आणण्यासाठी मदत झाली आहे. राज्यातील नाशिक शहर मोटार परिवहन विभाग हा पहिला विभाग आहे, ज्याने असे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे सर्व करण्याकरिता नितीन धोंडगे यांचा मोलाचा वाटा आहे.
वडिलांमुळे पोलिस दलाची आवड निर्माण झाली आणि वाहन चालविण्याची आवड असल्यामुळे पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाले. पोलिस दलात काम करत असतानाच Automobile Diploma हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मोटार परिवहन विभागात अनेक बदल घडवून आणले आहेत. अपर पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजन व समन्वय समितीच्या नियमानुसार विविध कामे करून घेण्यामध्ये नितीन धोंडगे यांचा मोलाचा वाटा आहे.
नितीन धोंडगे यांनी VIP Securityचा कोर्स पूर्ण केला असून, पंतप्रधानांच्या तीन दौऱ्यांचे त्यांनी नियोजन केले आहे. मोटार परिवहन विभागातील १७० सहकाऱ्यांच्या कुटुंबाची काळजी घेत असून, १७० कुटुंबाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. दैनंदिन कामकाजात अनेक बदल केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. शिवाय, गेल्या २४ वर्षांमध्ये एकही शिक्षा नाही अथवा चौकशी नाही. उलट ९२ रिवॉर्ड्स मिळाले आहेत. सहकारी आणि कुटुंबीयांसाठी वर्षातून एकदा गेट टुगेदरचे नियोजन करत असून, संपूर्ण जबाबदारी नितीन धोंडगे पार पाडतात.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

