
यवतमाळमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घडली रक्तरंजित घटना…
यवतमाळ: यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी रक्तरंजित घटना घडली आहे. दोन युवकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीतून हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये अचानक जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांनी तीक्ष्ण हत्याराने एकमेकांवर वार केले. या हल्ल्यात अभय उर्फ मित्तम पाठोडे (मूळ रा. राजुरवाडी, घाटंजी; सध्या रा. उमरसरा) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार श्री. चव्हाण हा या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गुन्हा घडल्यानंतर हल्लेखोरांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
View this post on Instagram
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अवधूतवाडी पोलिस ठाण्याला या संदर्भातील माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गंभीर जखमी झालेल्या श्री. चव्हाण याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
एकाच रात्री झालेल्या या दुहेरी हत्येच्या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत.
शेतकऱ्याला फायनान्सवाले घेऊन गेले अन् मृतदेहच हाती; कुटुंबाचा गंभीर आरोप…
‘खाकी’वर शोककळा! पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने उडवले अन्…
प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…
पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…
नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…

