
सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
सविता ढमढेरे या गेल्या २६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. आजोबा शिक्षक, वडील लष्करामध्ये असल्यामुळे वर्दीचे लहानपणापासून आकर्षण होते. पहिल्या प्रयत्नातच एमपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि शिरूर तालुक्यातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. त्यांच्याविषयी थोडक्यात…
सविता ढमढेरे यांचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी हे गाव. वडील लष्करात असल्यामुळे बालपण त्यांच्यासोबत गेले. यामुळे लहानपणापासून लष्करी अधिकारी आणि जवानांची वर्दी पाहत आल्या होत्या. शिवाय, कोंढापुरी गावचे सुपुत्र आणि माजी पोलिस अधिकारी फत्तेसिंह गायकवाड यांना पाहून पोलिस दलाचे आकर्षण निर्माण झाले होते. शिरूर तालुक्यातून पुढील शिक्षणासाठी पुणे शहरात दाखल झाल्या होत्या. शिक्षक एमपीएससीचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांनाही या अभ्यासक्रमाबद्दल समजले. कोणताही क्लास न लावता त्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नातच त्या परीक्षा पास झाल्या.
सविता ढमढेरे यांना तीन बहिणी आणि एक भाऊ. कोंढापुरी गावला मोठा इतिहास आहे. वडील लष्करात तर आजोबा शिक्षक होते. उच्चशिक्षित असे कुटुंब. कोंढापुरी गावचे माजी सरपंच आणि समाजसेवक कै. अरुणआबा गायकवाड, माजी पोलिस अधिकारी फत्तेसिंह गायकवाड यांच्यासह गायकवाड कुटुंबातील अनेकांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठे काम केले आहे. गायकवाड कुटुंबामधील अनेक मान्यवरांचे त्यांना लहानपणापासूनच मार्गदर्शन मिळाले होते. आपल्या नातीने पोलिस अधिकारी व्हावे, अशी आजोबांची इच्छा होती. पुढे त्यांनी ती पूर्ण केली.
बालपण…
सविता ढमढेरे यांचे बालपण वडिलांसोबत देशातील विविध भागांमध्ये लष्करी भागात गेले. शिवाय, पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षणही आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. वडिलांच्या अंगावर लहानपणापासून लष्करी गणवेश पाहत आल्या होत्या. लहानपणापासूनच देशप्रेम होते. पुढे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर कोंढापुरी गावामध्ये राहून त्यांनी पुढील शिक्षण चालू ठेवले. गावी आल्यानंतर आजोबांचे मोठे मार्गदर्शन लाभले. कोंढापुरी आणि शिरूर शहरामधून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी पुणे येथे दाखल झाल्या.
शिक्षण…
१ली ते ३री – आर्मी पब्लिक स्कूल
४थी ते ७वी – कोंढापुरी
८वी ते १०वी – रयत शिक्षण संस्था, शिरूर
११वी ते १२वी – रयत शिक्षण संस्था, शिरूर
१२ ते वाणिज्य पदवी – महर्षी कर्वे शिक्षण संस्था, पुणे.
आजोबांची इच्छा…
सविता ढमढेरे यांचे आजोबा हे जुन्या काळातील नामवंत शिक्षक होते. शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहत असतानाच अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. शिक्षण क्षेत्रातून आजोबा सेवानिवृत्त झाल्यानंतर ते नातवंडामध्ये रमत. शिवाय, शेती आणि जनावरांमध्ये वेळ घालवत. जनावरे चारायला जात असताना सविता यांना सोबत घेऊन जात. आजोबा त्यांना जनवारे वळता वळता शिक्षण, इतिहास, अभ्यासातील माहिती सांगत. यामुळे त्यांच्या सामान्यज्ञानात मोठी भर पडत होती. आजोबांनी नातीचा शिक्षणाचा पाया खरं तर लहानपणीच मजबूत केला होता. आजोबा शिक्षक असल्यामुळे विविध विषयांची माहिती त्यांची तोंडपाठ होती. आजोबांच्या ज्ञानाचा फायदा सविता यांना झाला. आपल्या नातीने उच्च शिक्षण घेऊन पोलिस अधिकारी व्हावे, अशी आजोबांची इच्छा होती. पुढे आजोबांची इच्छा सविता ढमढेरे यांनी पूर्ण केली.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

