
वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
वैशाली केशवराव घरटे या लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार. शाळेमध्ये असताना दहावीत त्या प्रथम आल्या होत्या. शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. पण, डीएडला प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षिकेचे स्वप्न अपूर्ण राहिले. १२वी नंतर लग्न झाल्यानंतर पतीची साथ मिळाली आणि पोलिस दलात भरती झाल्या. शिवाय, पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. पोलिस दलात गेल्या १४ वर्षांपासून काम करत असताना अनेक हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन नातेवाइकांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल राज्यस्तरीय महिला सक्षम पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात…
वैशाली केशवराव घरटे यांचे बालपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे गावी गेले. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. दोन भाऊ, एक बहीण आणि आई-वडील असे त्यांचे कुटुंब. शेतामध्ये काम करून भावंडांनी शिक्षण पूर्ण केले. मोठा भाऊ सीमा सुरक्षा दलात जाऊन देशाची सेवा करत आहे, तर दुसरा कंपनीमध्ये काम करत आहे. वैशाली या पोलिस दलात आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली असून, आई-वडिलांना मुलांचा मोठा अभिमान वाटत आहे. दुसरीकडे वैशाली यांचे पती दीपक गवळी यांनी मोठी साथ दिल्यामुळेच पोलिस दलात जोखून देऊन त्यांना काम करता येत आहे, असे वैशाली घरटे सांगतात.
बालपण…
वैशाली केशवराव घरटे यांचे बालपण अतिशय हलाखीमध्ये गेले. भावंडे शेती करून अभ्यास करत. शाळेमध्ये पहिल्यापासून हुशार. कुटुंबावर कर्ज असल्यामुळे कर्जदार वसुलीसाठी घरी येत. घरातील वस्तू घेऊन जाऊ नयेत म्हणून भावंडे घराला बाहेर कुलूप लावून आतमध्ये शांतपणे अभ्यास करत बसत. कुटुंबामध्ये अभ्यासाचे वातावरण नसायचे. पण, वैशाली यांनी लक्ष विचलित होऊ दिले नाही. शाळेमध्ये दहावीत व बारावीत असताना त्या प्रथम आल्या होत्या. शाळेसह संपूर्ण गावामध्ये त्यांचे मोठे कौतुक झाले होते.
शिक्षिका होण्याचे स्वप्न…
वैशाली या दहावीमध्ये प्रथम आल्यानंतर त्यांना डीएड करून शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. पण, डीएडसाठी एक हजार रुपये भरण्यासाठी सुद्धा जवळ पैसे नव्हते. सायन्सला जाऊन पुढे उच्च शिक्षण घ्यायचे होते. पण, गावाबाहेर जाऊन राहायचे तर पैशांची आवश्यकता होती. घरामध्ये पैसेच नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. अभ्यासात हुशार असताना आणि चांगले गुण मिळालेले असतानाही शिक्षिका होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
वैशाली घरटे यांचे आई-वडिल हे गरीब असताना देखील त्यांचे वैशाली यांना बीएपर्यंतचे शिक्षण उत्तमरीत्या देण्याचा प्रयत्न केला व ते त्यात उत्तम पालक म्हणून यशस्वी झाले. आई-वडिलांनी वैशाली यांना उत्तमरीत्या शिक्षण दिले व कुटुंबातील चांगले सस्कार दिल्याने त्यांची आयुष्याची पुढील वाटचाल खडतर परंतु यशस्वी झाली. वैशाली याना उत्तम शिक्षण व सुसंस्कारामध्ये आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
विवाह…
वैशाली यांना आर्थिक परिस्थितीचा मोठा फटका बसला. बारावीनंतर पुढील शिक्षण थांबले होते. पण, एका मैत्रिणीने एफवायचे शुल्क भरल्यामुळे प्रवेश घेता आला. पुढे एफवाय आणि एसवाय झाले. शिक्षण सुरू असतानाच विवाहाची बोलणी सुरू झाली. पतीच्या कुटुंबीयांनीच लग्नाचा खर्च उचलला होता. लग्न झाल्यानंतर सुद्धा काही तरी करण्याची जिद्द मनात होती.
पतीची साथ…
पत्नी वैशाली घरटे-गवळी अभ्यासात हुशार असल्याचे पतीला माहीत होते. यामुळे लग्नानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी मदत केली. पतीमुळे बीए आणि एमए डिस्टिंगशनमध्ये पूर्ण झाले. शिवाय, टायपिंग आणि एमएससीआयटीचा क्लाससुद्धा पूर्ण केला. लग्न झाले असले तरी घरात बसायचे नव्हते. शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचा होता. खासगी नोकरी करण्यास पतीचा विरोध होता. सासरकडील कुटुंबाला पोलिस दलाची पार्श्वभूमी होती. पतीचे देखील पोलिस होण्याचे स्वप्न होते. परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे पोलिस दलात नोकरी करण्याचे स्वप्न भंग झाले. परंतु, तरीदेखील पती यानी खचून न जाता त्यांच्या पत्नी वैशाली यांना पोलिस करण्याचा निश्चय केला. पतीने पोलिस भरतीसाठी फॉर्म भरला. शिवाय, पोलिस भरतीसाठी मेहनत करून घेतली. पोलिस भरतीच्या मुलाखतीमध्ये तर प्रथम आल्या आणि २०१०मध्ये पोलिस दलात दाखल झाल्या आणि एक मोठे स्वप्न साकार झाले. पतीकडील आणि माहेरकडील सर्वांना मोठा आनंद झाला.
पोलिस दलात दाखल…
वैशाली घरटे या पहिल्यापासूनच अभ्यासूवृत्तीच्या. पोलिस दलामध्ये याचा मोठा उपयोग होताना दिसत आहे. पोलिस दलामध्ये दाखल झाल्यानंतर २०२२ ते आजपर्यंत तब्बल १६४ हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. खुनाचा गुन्हा उघड केला आहे. तक्रार निवारण कक्षामध्ये काम करत असताना अनेकांना मार्गदर्शन केले आहे. गेल्या १४ वर्षांमध्ये अनेक चांगली कामे केल्यामुळे त्यांना १० प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. शिवाय, राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी उघड केलेले काही निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…
आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण…
एका आरोपीने आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. आरोपी कोण आहे, याबद्दल काहीच माहीत नव्हते. चिमुकलीची आई खूप रडत होती. डोळ्यांमधील अश्रू थांबत नव्हते. एका आईचे दुःख दुसऱ्या आईच जाणवू शकते. वैशाली घरटे यांनी तत्काळ बाळाचा शोध लावण्याचे ठरवले.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

