पुणे! घरी सांगितले चेन्नईला जातोय अन् २४व्या मजल्यावरून मारली उडी…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये युवकाचा २४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कुटुंबाला कामासाठी चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते, मात्र तो शहरातच थांबला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वैभव हा चांदखेड परिसरातील त्याचा मित्र सौरभ तापकीर याच्या पोल्ट्री फार्मवर कामाला होता. वैभव, सौरभ आणि त्यांचे काही मित्र बुधवारी रात्री पुनावळे येथील पेठकर सियोना हाउसिंग सोसायटीमध्ये जेवणासाठी जमले होते. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास वैभवने इमारतीच्या २४व्या मजल्यावरून खाली उडी मारली असल्याचा संशय आहे. आवाज होताच मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

वैभवने दोन दिवसांपूर्वी आपल्या काळेवाडीतील कुटुंबाला “मी कामासाठी चेन्नईला जात आहे” असे सांगितले होते. प्रत्यक्षात तो चेन्नईला न जाता पुनावळे परिसरातच थांबला होता. त्याने घरच्यांपासून ही गोष्ट का लपवून ठेवली, याबाबत आता गूढ निर्माण झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वैभव गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या मानसिक तणावात होता.

रावेत पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. वैभवच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास रावेत पोलिस करत आहेत.

पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…

पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!