
IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकारी म्हणून सत्य साई कार्तिक हे कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी हातामध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांना खुणावत होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून रणजीपर्यंत मजल मारली. बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) होऊन आयटी क्षेत्र खुणावत होते. परदेशात जाऊन एमएस करायचे होते. पण, लहानपणापासून लष्करात दाखल होऊन देशसेवा करण्याचे पाहिलेले स्वप्न आयपीएस अधिकारी झाल्यानंतर पोलिस दलाच्या माध्यमातून करत आहेत. सत्य साई कार्तिक यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवासाबद्दल थोडक्यात…
सत्य साई कार्तिक हे मुळचे हैद्राबादचे. मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म. आई-वडील आणि एक बहिण असे छोटे कुटंब. वडील बँकेत तर आई गृहीणीची जबाबदारी पार पाडत असतानाच छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम पाहात असे. सत्य साई कार्तिक यांना लहान पणापासून क्रिकेटची आवड. अभ्यास आणि खेळामुळे शालेय जिवनापासून व्यस्त अशी जीवनशैली. पहाटे पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहा वाजता संपे. तरुण वयात १५-१७ तास प्रचंड मेहनत घेतल्यामुळे यशाचे शिखर त्यांना गाठता आले आहे.
Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!
मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म…
सत्य साई कार्तिक यांचा हैद्राबादमधील मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील जन्म. एकत्र कुटुंब असल्यामुळे वडिलांवर मोठी आर्थिक जबाबदारी होती. वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत तर आई कुटुंब सांभळतानाच छोटा व्यवसाय सांभाळत असत. पुढे विभक्त कुटुंब झाले. कुटुंबावर कर्जाचा डोंगर होताच. विभक्त कुटुंब झाल्यानंतर दोन छोट्या खोल्यांमध्ये राहून दिवस काढले. यामुळे सत्य साई कार्तिक यांना लहानपणापासून गरिबीची जाणीव आहे. शिवाय, आई-वडिलांनी कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळतानाच मुलांवर संस्कार घडवले. शिवाय, उच्च शिक्षण दिले. हैद्राबाद येथील ऑल सेन्ट्स हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण तर जेएनटीयू विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली.
क्रिकेटचा वारसा…
सत्य साई कार्तिक यांच्या वडिलांना आणि काकांना क्रिकेटची आवड होती. पण, ते स्थानिक पातळीवरच क्रिकेट खेळले. वडिल आणि काकांच्या क्रिकेटच्या आवडीमुळे सत्य साई कार्तिक यांनाही क्रिकेट आवडू लागले. सत्य साई कार्तिक यांना सुरवातीला वजन कमी करण्यासाठी मैदानावर आणले. पण, त्याचा परिणाम असा झाला की ते मैदानावरच जास्त वेळ रमू लागले. पहाटे लवकर उठून मैदानावर तासन तास वेळ घालवत. मैदानावरून शाळेत आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा मैदानावर. पहाटे पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहा वाजता संपे. या वेळमध्ये मैदान, शाळा आणि अभ्यास चालायचा. लहान पाणापासूनच त्यांना प्रचंड मेहनतीची आवड निर्माण झाली होती. मैदानी खेळ आणि क्रिकेटमुळे ध्येय, जिद्द आणि एकाग्रतेसाठी मोठा फायदा झाला आहे, असे सत्य साई कार्तिक सांगतात.
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) पदवी…
लहान पणापासून खेळाची आवड असली तरी शिक्षणामध्येही ते हुषार होते. क्रिकेट आणि अभ्यासावरच त्यांचा प्रामुख्याने फोकस होता. यामुळे दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठी प्रगती केली होती. दहावी आणि बारावीच्या परिक्षेत त्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश प्राप्त केले होते. बारावीनंतर त्यांनी बी.टेक (कॉम्प्यटर सायन्स) ही पदवी प्राप्त केली.
रणजी पर्यंत मजल…
क्रिकेट आवडीचा खेळ. भारतीय क्रिकेटपटू अझरुद्दीन जेथे घडले होते. तिथेच सत्य साई कार्तिक यांनी क्रिकेटचे धडे घेतले होते. शालेय जिवनात असतानाच क्रिकेटमधून नाव कमावले होते. शाळेकडून १३, १४, १६ आणि १९व्या वर्षी क्रिकेट खेळले होते. शिवाय, संघाचे नेतृत्वही केले होते. क्रिकेटमधील प्रगती पाहता ते देशाकडून खेळतील असा अंदाज वर्तविला जात होता. रणजी पर्यंत त्यांनी मजल मारली होती. पण, काही कारणास्तव भारतीय क्रिकेट संघामध्ये नियुक्ती होऊ शकली नाही. पण, वाईट वाटून न घेता आजही त्यांनी छंद जोपासला आहे. क्रिकेटची आवड असणारा आणि आयपीएस अधिकारी झाल्यानंतर त्यांच्या फॅन फॉलोअसची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाय, अनेकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत.
आयटी कंपनीत नोकरी…
बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) पदवी हातात असल्यामुळे आयटी कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली होती. आयटी कंपनीत नोकरी लागल्यानंतर इतरांप्रमाणेच सत्य साई कार्तिक यांनाही आनंद झाला होता. पण, मैदानावर तासन तास वेळ घालवणाऱ्या खेळाडूला आयटी कंपनीमध्ये एका जागेवर बसने थोडे आवघड वाटू लागले होते. फार फार तर परदेशात जाऊन पैसे मिळवू, असे वाटत होते. पण, क्रिकेटच्या माध्यमातून देशाची सेवा करता येईल, असे कुटुंबियांनी सांगितले होते. किंवा लष्करात जाऊन देशसेवा करायची हा त्यांचा ध्यास होता. यामुळे नोकरीमध्ये त्यांचे मन काही रमत नव्हते. सहा महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आयटी कंपनी सोडून स्पर्धा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण, देशसेवा करण्याचे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे होते.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
UPSC परिक्षा देण्याचा निर्णय…
क्रिकेट आणि बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) पदवी घेतल्यानंतर परदेशात जाऊन एमएस करण्याचा विचार सुरू होता. पण, वडिलांनी स्पर्धा परिक्षा देण्याचा सल्ला दिला. क्रिकेट, बी. टेक आणि एमएस या तीन संधी हातात असताना UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परिक्षा देण्यापूर्वी तीन संधी हातात असल्यामुळे पूर्ण लक्ष स्पर्धा परिक्षेवर केंद्रीत केले. कारण, स्पर्धा परिक्षेत यश मिळाले नाही तर आयुष्यात पुढे काय करायचे? हा प्रश्न कधीच मिटलेला होता. एमएस साठी परदेशात जाण्याचा निर्णय रद्द करून स्पर्धा परिक्षा देण्याचा निर्णय कायम ठेवला.
हैद्राबाद ते दिल्ली प्रवास…
सत्य साई कार्तिक यांनी UPSC परिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हैद्राबाद वरून दिल्ली गाठले. हैद्राबादमध्ये असताना बहुतांश वेळ हा मैदानावर जाई. पण, दिल्लीला गेल्यानंतर पूर्ण बदल झाला. UPSC परिक्षेबद्दलही जास्त काही माहित नव्हते. जीवन प्रवासात एकदम ३६० अंशामध्ये बदल झाला होता. पण, जिद्द होती. क्रिकेटने खूप काही शिकवले होते. दिल्लीत दाखल झाल्यानंतर रात्रं-दिवस अभ्यास सुरू केला. सुरवातीला अवघड जात होते. पण, हळूहळू गाडी रुळावर येऊ लागली होती. हाताने नोट्स काढायला सुरवात केली. हाताखालून गेल्यामुळे उजाळणी होत होती. लिखाण एवढे केले की खोली अक्षरशः गठ्ठ्यांनी भरून गेली होती. अभ्यास आणि फक्त अभ्यास एवढा एकच ध्यास होता. काही करून यश मिळवायचे, ही जिद्द होती.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
किंमत – ३०० रुपये
WhatsApp: 93712 69949
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

