भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर, JCO कॅटरिंग आणि JCO रिलिजियस टीचर पदांसाठीही भरती जाहीर करण्यात आली आहे.

यंदाच्या भरती प्रक्रियेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता अर्जदारांना एकाच अर्जामध्ये दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि तरुणांना अधिक संधी मिळेल.

भरती शुल्क आणि अर्ज भरताना महत्त्वाचे नियम…
अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त 250 रुपये असून, ते ऑनलाइन जमा करावे लागेल. अर्ज भरताना 10वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे पालकांचे नाव भरावे लागेल. तसेच, मूळ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) आवश्यक असेल.

धावण्याच्या नियमांत शिथीलता…
धावण्याच्या नियमांमध्ये यंदा महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 1600 मीटर धावण्याची दोन गटांमध्ये विभागणी होती, मात्र यंदा चार गट करण्यात आले आहेत. यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे.

नवीन धावण्याचे निकष आणि गुणांकन…
5 मिनिटे 30 सेकंदात धावणे पूर्ण केल्यास 60 गुण
5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदात धावणे पूर्ण केल्यास 48 गुण
5 मिनिटे 46 सेकंद ते 6 मिनिटांत धावणे पूर्ण केल्यास 36 गुण
6 मिनिटे 1 सेकंद ते 6 मिनिटे 15 सेकंदात धावणे पूर्ण केल्यास 24 गुण

शारीरिक पात्रता आणि उंची निकष…
अग्निवीर GD, टेक्निकल, ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास) – उंची 170 सेमी, छाती 77 सेमी (82 सेमी फुगवून)
अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल – उंची 162 सेमी, छाती 77 सेमी (82 सेमी फुगवून)

शैक्षणिक पात्रता…
अग्निवीर GD – 10वी उत्तीर्ण, किमान 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक
अग्निवीर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये 50% गुण, प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण
अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण, एकूण 60 टक्के गुण, इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये 50 टक्के गुण आवश्यक
अग्निवीर ट्रेडसमॅन (10वी पास) – सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण
अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी पास) – सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण
महिला लष्करी पोलीस – 10वी उत्तीर्ण, 45 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुण आवश्यक

लेखी परीक्षा आणि पुढील प्रक्रिया…
अग्निवीर भरतीची लिखित परीक्षा जून महिन्यात अपेक्षित आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक www.joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे.

महत्त्वाची हेल्पलाइन…
अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणताही प्रश्न असल्यास 7518900195 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नमुना प्रश्नपत्रिकांद्वारे संगणक आधारित परीक्षेचा सराव करू शकतात. अग्निवीर भरतीसाठी सुवर्णसंधी – इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!