ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…

पुणे : ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि अश्फाक मकानदार या दोघांमध्ये गेल्या ५ महिन्यात ७० कॉल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही तावरे आणि मकानदार या दोघांनी मिळून काही बेकायदेशीर प्रकार केल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

अश्फाक बाशा मकानदार (३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी) आणि अमर संतोष गायकवाड (२७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी यापूर्वी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे तर मुलाला वाचवणाऱ्या त्याच्या बापासह, मुलाचे म्हणून स्वतःचे रक्त देणाऱ्या आईला तर चालकाचे अपहरण केल्याप्रकरणात मुलाच्या आजोबाला अटक झाली होती. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस करत असलेल्या तपासात मकानदार याची भूमिका ही पहिल्यापासूनच संशयास्पद आहे. तो अवैध धंद्याशी निगडित असून हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबरोबरच तो अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांसाठी पैसेही गोळा करत असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मकानदार याचा अपघात प्रकरणात देखील महत्त्वाचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तावरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतूनच झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले तर मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या दिवशी रक्ताच्या डीएनए तपासणीसंदर्भातील बातमी पसरली व अल्पवयीन मुलाच्या बापावर अटकेची टांगती तलवार लक्षात घेता मकानदार आणि त्यांच्यातील डील लांबणीवर पडली. दरम्यानच्या काळात मुलाच्या बापाची आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली. याच बैठकीत मकानदारने अल्पवयीन मुलाच्या बापाला तुझ्यावर कारवाई होईल, असे सांगितले. त्यानंतरच मुलाचा बाप संभाजीनगर येथे फरार झाला होता. बापाने डॉ. तावरे यांना कुणामार्फत पैसे दिले, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता. तपासात बापाने अश्फाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरे याला पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पसार झालेल्या अश्फाक आणि अमर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…

पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक…

पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…

पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…

पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…

पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…

पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…

पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…

पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!