
Video: नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं; अर्धनग्न महिलेचा टाहो…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसत आहे. तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का? असं कुणी एक व्यक्ती व्हिडीओमध्ये महिलेला विचारत आहे. यानंतर महिलेला त्या व्यक्तीला जे काही सांगतेय, ते फारच भयावह आणि संतापजनक आहे.
व्हिडीओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगते की, ‘माझ्यासोबत चुकीचे कृत्य झाले आहे. मला झाडाझुडपांत जबरदस्तीनं घेऊन जात, माझ्यासोबत बलात्कार करण्यात आला आहे. मी पोलिसांना देखील सांगितलं, पण त्यांनीही काहीच ऐकलं नाही, कारवाईसुद्धा केली नाही.”
गाजियाबाद की सड़क पर अर्धनग्न अवस्था में बैठी एक औरत कह रही है, “मैं कहती रही मेरे पांच बच्चे हैं छोड़ दो मुझे… नेताजी का बेटा मुझे झाड़ियां में ले गया… दारू की बोतल खोली दारू पिया और मेरा रेप किया…”
यह बात कितनी मार्मिक है! अगर यह सुन कर भी सत्ताधीश का दिल नहीं पसीजता है… pic.twitter.com/R09ZXRRDI0
— UP Congress (@INCUttarPradesh) August 21, 2024
गाझियाबादमधील लाल कुआन चौकीजवळ दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर पीडित महिला अर्धनग्न अवस्थेत बसली होती. महिलेचा असा दावा आहे की, काही लोकांनी तिला जबरदस्तीने नंदग्राम इथून उचलून झाडाझुडपांत नेले, तिथे तिच्यावर बलात्कार करून रात्री उशिरा लाल कुआ परिसरात सोडले. महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसन देखील आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, गाझियाबादच्या रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली एक महिला म्हणतेय की, मी त्यांना सांगत होते, मला पाच मुलं आहेत, मला सोडा, पण नेत्याचा मुलगा मला झुडपात घेऊन गेला. दारूची बाटली उघडून ती पिऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला. कोण आहेत नेताजी, ज्यांनी अशा मुलाला जन्म दिलाय? हे उघड व्हायला हवं आणि त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की, त्याला आपल्या आईच्या प्रेमाची किंमत समजेल.’
सहाय्यक पोलिस आयुक्त पूनम मिश्रा यांनी सांगितले की, ‘सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला अर्धनग्न बसली आहे आणि ती काही आरोप करत आहे. या संदर्भात सखोल तपास केला असता चौकी परिसर, लाल कुआ पोलिस ठाणे, वेव्ह सिटी असे प्रकरण होते. यामध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यांनी महिलेशी बोलून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अन्य माध्यमांच्या मदतीने तिचं घर शोधून काढण्यात आले आहे. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. यापूर्वीही ती अशाच पद्धतीने हरिद्वार, रुरकी आदी ठिकाणी गेली होती. ती अचानक घरातून निघून जाते. महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास करत आहोत.’
बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…
शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…
Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

