पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….

पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात ही घटना घडली.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुणे शहरात शुक्रवारी (ता. ५) संध्याकाळी वाहतूक एपीआय शैलेजा दराडे-जानकर आणि त्यांचे सहकारी ड्रंक आणि ड्राईव्हच्या केसेस तपासत होते. संजय साळवे हा बाईकस्वार ब्रीथ अॅनायलायझर टेस्टला नकार देऊन गोंधळ घालू लागला. पोलिसांनी त्याला फरासखाना चौकीत आणले असता त्याने नजर चुकवून एका छोट्या बाटलीत बाहेरून कुठनतरी पेट्रोल भरून आणले आणि थेट महिला पोलिस अधिकारी शैलेजा दराडे जानकर यांच्या अंगावरच ओतले आणि लायटरने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

आरोपी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तो मूळचा जालन्याचा असून पिंपरीत डंपर चालवायचा. पण मध्यंतरी त्याची नोकरी गेल्याने तो नैराश्यात होता, अशी माहिती पुढे आली आहे. वाहतूक महिला पोलिस पोलिस अधिकाऱ्यास पेटवून देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपी संजय फकीरा साळवे याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे न्यायालयाने आरोपी साळवे याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

पुणे पोर्शे कार प्रकरणातील आजोबा आणि बापाला जामीन; पण…

पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याचा राग; मुलाच्या वडिलांनाच संपवले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!