ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुकक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ड्रग माफिया ललित पाटील याला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीने दोषी ठरवल आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटा अहवाल तयार करत होते.
डॉ. संजीव ठाकूर ससून रुग्णालयाचे डीन म्हणून दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर 2020 पासून ठाण मांडून होता. त्यामुळे डॉक्टर ठाकूर यांच्या आधीच डीन आणि अधिकार्यांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरची ही कारवाई म्हणजे धूळफेक आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. कारण ससूनच्या डीन पदी डॉक्टर ठाकूर यांची नियुक्ती करण्यासाठी ससुनचे आधीचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची मुदती आधी बदली करण्यात आली होती. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टर काळे यांनी मॅटमधे दाद मागितली होती. मॅटने शुक्रवारी डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल देताना डॉक्टर संजीव ठाकूर यांना तात्काळ पदमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉक्टर ठाकूर यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले. ललित पाटील याच्यावर एकुण सहा डॉक्टर उपचार करत होते. या सहापैकी चारच डॉक्टरांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत.
ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!