रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (रा. भडगाव ), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (रा. अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे मित्र संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. यावेळी ही घटना घडली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. याबाबतची पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…

भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!