
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या धनिक पुत्राने दोघांचे बळी घेतल्यानंतर दरररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह वॉर्डबॉयला निलंबित केले आहे. तर डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबानंतर त्याच्या आईलासुद्धा अटक केली जाण्याची शक्यता आहे.
वडील आणि आजोबांनंतर आईसुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून, पोलिस आता शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत. ससून हॅास्पिटलमधील डॅाक्टरांवर दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रूग्णालयात स्वतः हजर होती, अशी सूत्रांची माहिती आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी चौकशी समितीने सरकारला अहवाल सादर केला. यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने ससूनचे अधिष्ठाचा डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
कल्याणीनगर अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. मात्र, अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे होते, हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे समोर आली आहे.
पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांची देखील चौकशी होणार असल्याचे समजते. त्यातच, आता शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अगरवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे, पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. तर, शिवानी अगरवाल यांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अगरवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
दरम्यान, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने देत असताना तिथे दोघे नव्हे तर तिघेजण उपस्थित होते अशीही माहिती समोर आली आहे. चौकशी अहवालात अल्पवयीनाच्या रक्ताचे नमुने बदलून तिथे एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आई शिवानी अगरवाल यांचे रक्ताचे नमुने दिल्याचे समोर आले तर त्यांनाही अटक केली जाऊ शकते.
पुणे पोलिसांनी आता अगरवाल कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त केले आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि त्यांचा मोठा मुलगा आणि अल्पवयीन आरोपीचा पासपोर्ट ही जप्त केला आहे. अपघात घडला तेव्हा शिवानी अगरवाल या ससून हॉस्पिटलमध्ये हजर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे.
अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या Forensic Medicine And Toxicology विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. श्रीहरी हरनोळ यांच्या विभागाने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. मात्र, त्यामध्ये मद्याचा अंश सापडू शकतो, हे लक्षात आल्यावर दोन्ही डॉक्टरांनी धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पलच बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र, तरीही तावरे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धनिकपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करायला सांगितली. या अल्पवयीन मुलाच्याऐवजी दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुढे करण्यात आले. मात्र, पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवून DNA टेस्ट करायचे ठरवले आणि डॉक्टरांचे बिंग फुटले.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…
पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

