शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार कैलास काकडे याचेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार कैलास काकडे (रा. फ्लॅट नं. ११०९/सी, एस. आर.ए. बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर पुणे) याचेविरुध्द पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगारावर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करणेकरीता अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी सदर गुन्ह्याचा अभ्यास करून कायद्यातील तरतुदीचे निकषाप्रमाणे योग्य असल्यास MPDA कायद्यातंर्गत कारवाई करणेबाबत जा.क्र./ अपोआ/गुन्हे / प्रतिबंधक शाखा / ३४ / २०२३, दि. १२/०५/२०२३ अन्वये लेखी आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमूद आरोपीविरुध्द दाखल गुन्ह्याचा अभ्यास करून प्रस्ताव तयार केला.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी तुषार कैलास काकडे (रा. फ्लॅट नं. ११०९/सी, एस. आर. ए. बिल्डींग, शिंदे वस्ती, हडपसर पुणे) यास पोलिस आयुक्त यांचे कार्यालय जा.क्र. / पी. सी. बी. / स्थानबध्द / शिवाजीनगर / काकडे/५९० / २०२३, दि. १८/११/२०२३ अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) वाळूची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, १९८१ चे कलम ३ (२) अन्वये ०१ वर्षाकरीता अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश झाल्याने नमूद गुन्हेगारास दि. २२/१०/२०२३ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी केली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, संदीप सिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परि. १, पुणे शहर, वसंत कुवर, सहा. पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विक्रम गौड, पोलिस उप निरीक्षक विशाल शिंदे, पोहवा – ३०८१ मेमाणे, पोशि- १९१७ नागरे व पोशि-९८३९ झांबरे (सव्हॅलन्स पथक) शिवाजीनगर पोलिस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…
बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…
पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!