अभिजीत दीपके यांना न्यायालयात सशर्त जामीन मंजूर; शांतता भंगाबाबत सक्त इशारा…

नवी दिल्लीः कॉक्रोरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली न्यायायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दीपके यांना शांतता बंधपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १२६/१७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कवर शुक्रवारी (ता. १६) रोजी झालेल्या तिरंगा मार्च दरम्यान त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, काही काळानंतर ताकीद देऊन सोडून देण्यात आले होते.

आज दुपारी त्यांना मंदिर मार्गावरील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये प्रदीर्घ युक्तिवाद झाला. न्यायालयाने आता दीपके यांना जामीनपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दीपके यांनी यापुढे शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!